उमेदवारी मागे घेण्यासाठी मनधरणी

By Admin | Published: July 23, 2015 12:08 AM2015-07-23T00:08:01+5:302015-07-23T00:08:01+5:30

वाशिम जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ४ हजार ७९६ उमेदवार रिंगणात.

Consideration to withdraw candidature | उमेदवारी मागे घेण्यासाठी मनधरणी

उमेदवारी मागे घेण्यासाठी मनधरणी

googlenewsNext

वाशिम : ४ ऑगस्ट रोजी होऊ घातलेल्या जिल्हयातील १६३ ग्रामपंचायत निवडणुकीतील १४९५ सदस्यांसाठी ४ हजार ७९६ उमेदवार रिंगणात आहेत. २३ जुलै रोजी अर्ज मागे घेण्याची तारीख असल्याने विजयात अडथळा निर्माण करणार्‍या काही उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी तगादा लावण्यात येत आहे. यासाठी नेत्यांची धडपड सुरु असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जिल्हयातील १६३ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ४९२६ उमेदवारांनी अर्ज भरले होते. अर्ज छाननीच्या दिवशी विविध कारणास्तव यामधील १३0 अर्ज रद्द झाल्याने आता ४७९६ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम आहेत. यामधील काही उमेदवार गुरुवारी स्वताहून अर्ज मागे घेवून कमी होण्याची शक्यता आहे. तर काहींना निवडणूक अर्ज मागे घेण्यासाठी विविध पक्षाचे , गटाचे नेते बैठका घेवून अर्ज मागे घेण्यासाठी विणवणी करतांना दिसून येत आहेत. रिसोड तालुक्यातील चिखली सर्कलमध्ये यासंदर्भात २२ जुलै रोजी बैठक होवून काही निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असलेल्या व अर्ज भरलेल्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. वाशिम तालुक्यात २३ ग्रामपंचायतसाठी २३१ सदस्य निवडून दयावयाचे आहे, याकरिता ६८७ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम आहेत. तसेच मालेगाव तालुक्यात ३0 ग्रामपंचाय तीच्या होणार्‍या निवडणुकीतील २७६ जागेसाठी ९५५, मंगरूळपीर तालुक्यात २५ ग्रामपंचायत निवडणुककरिता २0९ जागेसाठी ७६३ , रिसोड तालुक्यात ३४ ग्रामपंचायतकरिता ३३४ जागेसाठी ११0१ उमेदवार, कारंजा तालुक्यात २८ ग्रामपंचायसाठी २११ जागेसाठी ६७0 तर मानोरा तालुक्यातील २३ ग्रामपंचायतसाठी २३४ जागेसाठी ६२0 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. गा्रमपंचायत निवडणुकीचे जिल्हयात वारे वाहण्यास प्रारंभ झाला असून ग्रामीण भागात भेटी गाठी घेण्यास सुरुवात झाली आहे. उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावे यासाठी अनेकांनी प्रयत्न चालविले आहेत.

Web Title: Consideration to withdraw candidature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.