वाशिम जिल्ह्यात संकलित मुल्यमापन चाचणीस प्रारंभ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 09:05 PM2017-11-08T21:05:44+5:302017-11-08T21:09:08+5:30

वाशिम: प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत बुधवार, ८ नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी संकलित मुल्यमापन चाचणीस प्रारंभ झाला असून शिक्षण विभागाच्या वेळापत्रकानुसार ११ नोव्हेंबरपर्यंत हा उपक्रम शाळास्तरावर राबविला जाणार आहे.  

Consolidated Valuation Test starts in Washim district! | वाशिम जिल्ह्यात संकलित मुल्यमापन चाचणीस प्रारंभ!

वाशिम जिल्ह्यात संकलित मुल्यमापन चाचणीस प्रारंभ!

googlenewsNext
ठळक मुद्देप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमइयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत बुधवार, ८ नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी संकलित मुल्यमापन चाचणीस प्रारंभ झाला असून शिक्षण विभागाच्या वेळापत्रकानुसार ११ नोव्हेंबरपर्यंत हा उपक्रम शाळास्तरावर राबविला जाणार आहे.  
विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीकरिता प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये वर्षभरात तीन वेगवेगळ्या चाचण्या घेतल्या जातात. यावर्षी यामध्ये काही प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. सप्टेंबर महिन्यातील ७ ते १२ यादरम्यान पायाभूत चाचणी घेण्यात आली होती. आता इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी संकलित मूल्यमापन चाचणी घेतली जात आहे. त्यानुसार, पहिल्या दिवशी भाषा विषयाचा पेपर घेण्यात आला. गुरूवार, ९ नोव्हेंबरला गणित विषयाचा पेपर होणार असून इयत्ता तीसरी ते आठवीचा इंग्रजीचा पेपर १० नोव्हेंबरला घेण्यात येणार आहे. तसेच इयत्ता सहावी ते आठवीचा विज्ञानचा पेपर ११ नोव्हेंबरला होईल, असे शिक्षण विभागाकडून कळविण्यात आले आहे. 

Web Title: Consolidated Valuation Test starts in Washim district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.