मतदार संघातील रस्ते राष्ट्रीय महामार्गाशी जुळणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:42 AM2021-03-27T04:42:28+5:302021-03-27T04:42:28+5:30

खा. भावना गवळी यांनी सांगितले की, मतदारसंघातील व परिसरातील उर्वरित रस्ते राष्ट्रीय महामार्गाशी जाेडले जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने ...

Constituency roads will be connected to National Highways! | मतदार संघातील रस्ते राष्ट्रीय महामार्गाशी जुळणार !

मतदार संघातील रस्ते राष्ट्रीय महामार्गाशी जुळणार !

Next

खा. भावना गवळी यांनी सांगितले की, मतदारसंघातील व परिसरातील उर्वरित रस्ते राष्ट्रीय महामार्गाशी जाेडले जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने कारंजा-मूर्तीजापूर राष्ट्रीय महामार्ग एन.एच - ३६१ सी मुंबई - नागपूर महामार्ग क्र. ६ ला जोडण्यात यावा , राष्ट्रीय महामार्ग ७५३ सी जालना-सिंदखेडराजा - मेहकर - मालेगाव - कारंजा - पुलगाव - वर्धा या महामार्गाची अवस्था रहदारीमुळे अत्यंत बिकट झालेली आहे. याकरिता या महामार्गाचे नूतनीकरण करण्यात यावे, राज्य महामार्ग ५४८ सी रिसोड - मेहकर या रस्त्याला सक्रिय महामार्गामध्ये समाविष्ठ करून घेऊन मंजुरात प्रदान करावी, राज्य महामार्ग पुसद – गुंज - महागाव या ४० किमी. रस्त्याचे राष्ट्रीय महामार्गाचे समावेश करून रस्ता मंजूर करण्यात यावा. तसेच मध्यप्रदेश - महाराष्ट्र व आंधप्रदेश अशा तीन राज्यामधून मध्यप्रदेशातील हरिसालपासून आदिवासी भाग असलेल्या धारणीपासून अचलपूर- परतवाडा-अमरावती- नेर- यवतमाळ- करंजी राष्ट्रीय महामार्ग हैदराबाद क्र. ७ ला जोडणारा ३०० किमी. लांबीचा ज्याची १९० किमी. लांबी अमरावती जिल्ह्यामधून व ११० किमी. लांबी यवतमाळ जिल्ह्यामधून जाते.

ज्या रस्त्यावर प्रचंड रहदारी असून एकेकाळी ४ लेनच्या रस्त्याचा प्रस्ताव असलेल्या या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गामध्ये समाविष्ट करून घेऊन २ लेनचा राष्ट्रीय महामार्ग करण्यात यावा, ही महत्त्वाची मागणी रस्ते व महामार्ग विकासमंत्री ना. नितीन गडकरी यांनी मंजूर केल्याचे खा. भावना गवळी यांनी सांगितले.

Web Title: Constituency roads will be connected to National Highways!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.