लोकसहभागातून बंधाऱ्यांची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:25 AM2021-07-03T04:25:29+5:302021-07-03T04:25:29+5:30
----------- संत्रा व्यवस्थापनावर मार्गदर्शन वाशिम : कृषी विज्ञान केंद्र, वाशिमकडून संत्रा उत्पादकांना मार्गदर्शन कारण्यासाठी संत्रा व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षणाची मालिका यंदा ...
-----------
संत्रा व्यवस्थापनावर मार्गदर्शन
वाशिम : कृषी विज्ञान केंद्र, वाशिमकडून संत्रा उत्पादकांना मार्गदर्शन कारण्यासाठी संत्रा व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षणाची मालिका यंदा नियोजित करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘संत्रा पिकातील मृग बहार व्यवस्थापन’ याविषयी ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.
=------------------
वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडित
वाशिम : आसेगाव परिसरात दोन दिवसांपूर्वी रात्री वादळीवारा सुटला. यामुळे काही वेळ वीज पुरवठा खंडित करण्यात आला. यामुळे ग्रामस्थांची गैरसोय झाली. तथापि, काही वेळानंतरच हा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला.
-----
कामगारांना रोजगार देण्याची मागणी
वाशिम : कामरगाव परिसरातील गावातून रोजगारासाठी परजिल्ह्यात गेलेले शेकडो कामगार गावी परत आले आहेत. मात्र, परिसरात कोणतीच कामे नसल्याने हे कामगार वर्षभरापासून बेरोजगार आहेत. प्रशासनाने या कामगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी सरपंच व पोलीसपाटलांनी गुरुवारी केली.
---------
कामरगावात शेतकऱ्यांना मार्गदर्शन
वाशिम : खरीप हंगामातील पिकांच्या विविध किडींवर नियंत्रणाबाबत कामरगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात गुरुवारी शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला.
-------
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे चालकांची कसरत
वाशिम : येथील निर्माणाधीन उड्डाण पुलाच्या बाजूला असलेल्या दोन्ही रस्त्यांची अवस्था वाईट झाली आहे. यावर मोठमोठे खड्डे पडले असून, या खड्ड्यांत पावसाचे पाणी साचून गटारे झाली आहेत. त्यामुळे या रस्त्यावर वाहने चालविताना चालकांची मोठी कसरत होत असल्याचे चित्र दरदिवशी पाहायला मिळत आहे.
^^^^^^^^^^