लोकसहभागातून गॅबियन बंधाऱ्यांची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:28 AM2021-06-18T04:28:50+5:302021-06-18T04:28:50+5:30
पाणी फाउंडेशनकडून वॉटर कप स्पर्धेच्या धर्तीवरच आता समृद्ध गाव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. वॉटर कप स्पर्धेच्या तीन सत्रात ...
पाणी फाउंडेशनकडून वॉटर कप स्पर्धेच्या धर्तीवरच आता समृद्ध गाव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. वॉटर कप स्पर्धेच्या तीन सत्रात सहभाग घेणाऱ्या गावाचीच या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असून, या स्पर्धेत गावकरी आणि शेतकऱ्यांच्या श्रमदानातून गावे समृद्ध करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यात वॉटर कप स्पर्धेप्रमाणेच जलसंधारणाची कामे केली जात आहेत. त्याशिवाय समृद्ध शेतीसाठी कंपोष्ट, नाडेप खतनिर्मिती, वृक्ष लागवडीसह विहिरींच्या पातळीचे मोजमाप आदी कामेही केली जात आहे. आता या स्पर्धेदरम्यान काही गावांत विविध प्रकारच्या बंधाऱ्यांचे कामे गावकरी लोकसहभागातून करीत आहेत. त्यात गॅबियन बंधाऱ्यांचा समावेश आहे. तज्ज्ञ मंडळीच्या मार्गदर्शनात गावकरी उभारत असलेले बंधारे लक्ष वेधत आहेत. असेच बंधारे मंगरुळपीर तालुक्यातील तपोवन या गावातही उभारण्यात आले आहेत.