वाशिम जिल्ह्यात रेतीअभावी घरांचे बांधकाम ठप्प!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 03:08 PM2019-03-02T15:08:25+5:302019-03-02T15:08:28+5:30
वाशिम : जिल्ह्यातील पैनगंगा नदीवरील रेती उपसा करण्यायोग्य सर्व रेतीघाटांचा लिलावास गेल्या दोन वर्षांपासून ‘ब्रेक’ लागला आहे. परिणामी, जिल्ह्यात कुठेच रेती उपलब्ध नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील पैनगंगा नदीवरील रेती उपसा करण्यायोग्य सर्व रेतीघाटांचा लिलावास गेल्या दोन वर्षांपासून ‘ब्रेक’ लागला आहे. परिणामी, जिल्ह्यात कुठेच रेती उपलब्ध नाही. परजिल्ह्यातून अथवा चोरट्या मार्गाने येणाºया रेतीचे दर अव्वाच्या सव्वा असून ती रेती परवडेनाशी झाली आहे. या सर्व बाबींमुळे जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी घरांचे बांधकाम ठप्प झाले आहेत. यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ ओढवली असून या क्षेत्रातील इतरही घटकांवर प्रतिकुल परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.
रेतीअभावी घरांचे बांधकाम गेल्या अनेक दिवसांपासून ठप्प पडल्याने कामगारांना रोजगार उपलब्ध राहिलेला नाही. त्यामुळे या क्षेत्रातील कामगार रोजगाराअभावी अन्यत्र स्थलांतरण करित आहेत. याशिवाय बांधकाम व्यवसायाशी निगडीत मालवाहू वाहनधारक, नळांची कामे करणारे प्लंबर, इलेक्ट्रिशीयन, टाईल्स बसविणारे मजूर, रंगरंगोटी करणारे पेंटर, सिमेंट व अन्य साहित्य विक्रीचे व्यावसायिकही अडचणीत आले आहेत. ही बाब लक्षात घेवून योग्य ती प्रशासकीय कार्यवाही करावी व काही रेतीघाटांचे लिलाव करून प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी या क्षेत्रातील कामगारांमधून होत आहे.