शौचालय बांधकामाची मुदत तीन दिवसांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:57 AM2021-02-26T04:57:47+5:302021-02-26T04:57:47+5:30
कोरोना काळात विद्युतच्या थकबाकीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. वारंवार आवाहन करूनही देयके अदा झालेली नाहीत. यामुळे अखेर महावितरणने विद्युतपुरवठा ...
कोरोना काळात विद्युतच्या थकबाकीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. वारंवार आवाहन करूनही देयके अदा झालेली नाहीत. यामुळे अखेर महावितरणने विद्युतपुरवठा खंडित करण्याची कार्यवाही अवलंबिली असल्याची माहिती कार्यकारी अभियंता आर.जी. तायडे यांनी दिली.
..............
मुख्य चौकांमधून अवैध वाहतूक
वाशिम : शहरातील पोस्ट ऑफिस चौक, पुसद नाका, हिंगोली नाका, रिसोड नाका आदी ठिकाणांहून अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे. पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष पुरवून कारवाई करावी, अशी मागणी आकाश गोटे यांनी बुधवारी केली.
.............
एकबुर्जी प्रकल्पातील जलसाठ्यात घट
वाशिम : रब्बी हंगामात सिंचनासाठी पाणी वापरण्यासह गेल्या काही दिवसांपासून कडक उन्हे तापत असल्याने एकबुर्जी प्रकल्पातील जलसाठ्यात घट झाल्याचे दिसून येत आहे.
..............
राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती
मालेगाव : येथून वाशिमकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम गतीने पूर्ण केले जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत संपूर्ण रस्ता पूर्णत्वास जाईल, असे चित्र दिसून येत आहे.
...................
जिल्हा कचेरीतील स्वच्छतागृह अस्वच्छ
वाशिम : स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयात अद्याप मुबलक पाण्याची सुविधा उपलब्ध झालेली नाही. स्वच्छतागृहांमध्येही पाण्याअभावी अस्वच्छता पसरत असून याकडे लक्ष पुरविण्याची मागणी अविनाश मुळे यांनी बुधवारी निवेदनाव्दारे केली.
................
कोरोनाच्या चाचण्यांची संख्या वाढली
वाशिम : गेल्या काही दिवसांपासून कोरोना चाचण्यांची संख्या वाढलेली आहे. यामुळेच पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येतही भर पडत असल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. बालाजी हरण यांनी दिली.