गांडूळ खत युनिटचे बांधकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:38 AM2021-03-08T04:38:54+5:302021-03-08T04:38:54+5:30
---------------- आसेगावात संचारबंदीचे कठोर पालन वाशिम: कोरोना संसर्ग नियंत्रित करण्यासाठी दर शनिवारी सायंकाळपासून सोमवार सकाळपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदीचे आदेश दिले ...
----------------
आसेगावात संचारबंदीचे कठोर पालन
वाशिम: कोरोना संसर्ग नियंत्रित करण्यासाठी दर शनिवारी सायंकाळपासून सोमवार सकाळपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदीचे आदेश दिले आहेत. त्याचे कठोर पालन आसेगाव पोलीस स्टेशनअंतर्गत होत असल्याने गावात शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
----------------
शहरात जंतनाशक गोळ्यांचे वितरणच नाही
वाशिम : राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेंतर्गत आरोग्य विभागाकडून ग्रामीण भागांत घरोघरी जंतनाशक गोळ्यांचे वितरण केले जात असले तरी, नगरपरिषदेच्या हद्दीत शहरांतर्गत अद्यापही मुलांना जंतनाशक गोळ्यांचे वितरण सुरू करण्यात आलेले नाही.
----------------
खंडाळा प्रकल्पात ३० टक्के साठा
वाशिम : तालुक्यातील खंडाळा येथील प्रकल्प पावसाळ्यात शंभर टक्के भरला होता; परंतु सिंचनासाठी वारेमाप उपसा झाल्याने या प्रकल्पाची पातळी झपाट्याने खालावली. सद्य:स्थितीत या प्रकल्पात केवळ ३० टक्के जलसाठा उरला आहे.
------------------
३० विद्यार्थ्यांना जातपडताळणीची प्रतीक्षा
वाशिम : उच्चशिक्षणासाठी जातपडताळणी प्रमाणपत्र आवश्यक असून, यासाठी जिल्हास्तर जातसमितीकडे प्रस्ताव सादर केलेल्या ३० विद्यार्थ्यांना अद्यापही जातपडताळणी प्रमाणपत्र मिळाले नाही. त्यामुळे त्यांच्या कार्यालयात वाऱ्या सुरू आहेत.
---------
===Photopath===
070321\07wsm_6_07032021_35.jpg
===Caption===
गांडूळ खत युनिटचे बांधकाम