वाशिम येथील पशू दवाखान्याचे बांधकाम ठप्प

By admin | Published: January 7, 2015 12:58 AM2015-01-07T00:58:42+5:302015-01-07T00:58:42+5:30

दोन वर्षांपूर्वी निधी मंजूर ; पूर्णवेळ अधिकारी नसल्याने पशुपालक त्रस्त.

Construction of veterinary hospital jam in Washim | वाशिम येथील पशू दवाखान्याचे बांधकाम ठप्प

वाशिम येथील पशू दवाखान्याचे बांधकाम ठप्प

Next

वाशिम : नादुरुस्त पशुवैद्यकीय दवाखान्यांचे बांधकाम करण्यासाठी २0१३ च्या जानेवारी महिन्यातच निधीची तरतूद करण्यात आली होती; मात्र दोन वर्षे लोटल्यानंतरही अनसिंग व इतर काही पशू दवाखान्यांची स्थिती कायम असल्याचे चित्र आहे.
जिल्हय़ात ङ्म्रेणी एकचे १७ तर ङ्म्रेणी दोनचे ४१ असे एकूण ५८ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. यापैकी जवळपास १२ दवाखाने भौतिक सुविधांअभावी बिमार आहेत. खिडक्या व दरवाजाची दुरवस्था, इमारतीला गेलेले तडे, कवेलू किंवा टिनांमधून आतमध्ये प्रकाश किंवा पावसाच्या सरी कोसळणे, एका फरशीचे तीन-चार तुकडे होणे, पाण्याची सुविधा नसलेले ठिकाण म्हटले की जिल्हय़ातील पशुवैद्यकीय दवाखाना किंवा उपचार केंद्रांकडे बोट दाखविले जाते. दवाखान्यांची दुरुस्ती करण्याचा पशुपालकांचा रेटा आणि जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाचा शासनाकडे पाठपुरावा यामुळे पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या दुरुस्तीसाठी पुरेशा प्रमाणात निधी मंजूर झाला.
परिसरातील ३0 खेड्यातील जनावरांना अल्प दरात वैद्यकीय उपचार मिळावा या दृष्टिकोनातून अनसिंग येथे पशुवैद्यकीय दवाखान्याची निर्मिती करण्यात आली. निर्मितीनंतर एका वर्षानंतर या दवाखान्याला समस्यांनी ग्रासले. समस्यांचे ग्रहण अजूनही सुटले नाही. मागील तीन वर्षांपासून येथे पशुवैद्यकीय अधिकारी नाही. या पदाचा प्रभार अन्य डॉक्टरांकडे सोपविला आहे. एकाच डॉक्टरांकडे दोन-तीन दवाखान्याचा कारभार असल्याने त्यांनी कुणाकडे लक्ष द्यावे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

Web Title: Construction of veterinary hospital jam in Washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.