बँकेच्या बेताल कारभाराने ग्राहक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:30 AM2021-09-02T05:30:10+5:302021-09-02T05:30:10+5:30
कारंजा तालुक्यातील कामरगाव येथे भारतीय स्टेट बँकेची मुख्य शाखा स्थापन करण्यात आली असून या शाखेतून ग्राहकांना समाधानकारक सेवा मिळणे ...
कारंजा तालुक्यातील कामरगाव येथे भारतीय स्टेट बँकेची मुख्य शाखा स्थापन करण्यात आली असून या शाखेतून ग्राहकांना समाधानकारक सेवा मिळणे अपेक्षित असताना बँकेतील काही अधिकाऱ्यांच्या हेकेखोरवृत्तीने चालत असलेल्या बँकेतील कारभाराने ग्राहक वैतागले आहे. दिवसागणिक वारंवार बँकेच्या एटीएममध्ये पैशांचा खडखडाट असणे, शासनाचे पीककर्ज उद्दिष्टपूर्तीचे आदेश असतानाही पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना त्रास देणे व कर्ज देण्यास विलंब करणे तसेच पासबुकवरील एन्ट्रीसाठी खातेदारांना बँकेत चकरा मारायला लावणे हे नित्याचेच झाले आहे. आतापर्यंत काहींनी या विरोधात बँकेच्या शाखा व्यवस्थापकाकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला, परंतु शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न बँकेतील शाखा व्यवस्थापकासह इतर कर्मचाऱ्यांकडून केल्या जात आहे. जिल्हा, बँक नियंत्रण अधिकाऱ्यांनी एकदा तरी कामरगाव येथील एसबीआय शाखेस भेट देऊन ग्राहकांच्या समस्या जाणून घ्याव्या, अशी मागणी ग्राहक व व्यापारी संदीप तुमसरे व शेतकऱ्यांकडून केल्या जात आहे.