सर्दी, खोकला असल्यास संपर्क साधावा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:28 AM2021-07-10T04:28:12+5:302021-07-10T04:28:12+5:30

---------------- स्वच्छतेबाबत ग्रामस्थांत जनजागृती वाशिम : कोरोना विषाणूचा संसर्ग थांबविण्यासाठी मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथे ग्रामपंचायतीकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत ...

Contact if you have a cold or cough! | सर्दी, खोकला असल्यास संपर्क साधावा !

सर्दी, खोकला असल्यास संपर्क साधावा !

Next

----------------

स्वच्छतेबाबत ग्रामस्थांत जनजागृती

वाशिम : कोरोना विषाणूचा संसर्ग थांबविण्यासाठी मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथे ग्रामपंचायतीकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत असून, याअंतर्गत ग्रामपंचायतीच्यावतीने स्वच्छतेबाबत शुक्रवारी जनजागृती करण्यात आली.

---------------

कामरगाव येथील बाजार राहणार बंद

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर कामरगाव येथे भरणारा आठवडी बाजार या आठवड्यातही भरणार नाही. ९ जुलै रोजी ग्रामपंचायतीने त्याबाबत गावात माहितीही दिली असून, सूचनेचे पालन करण्याचे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे.

----------

कोरोनाबाबत जनजागृती

वाशिम : कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पृष्ठभूमीवर आरोग्य विभागाकडून दक्षता घेतली जात आहे. याअंतर्गत ९ जुलै रोजी आसेगाव परिसरात जनजागृती करण्यात आली.

----------------

पोलिसांकडून वाहनांची तपासणी

वाशिम : जिल्ह्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनांची तपासणी पोलिसांकडून केली जात आहे. याअंतर्गत कारंजा - मानोरा मार्गावर २४ वाहनचालकांवर पोलिसांनी गुरुवारी कारवाई केली. गेल्या चार दिवसांत अनेक वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.

-----------

Web Title: Contact if you have a cold or cough!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.