संपर्क क्रमांकावर नोंदविता येणार ध्वनिप्रदूषणासंदर्भातील तक्रारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 01:41 AM2017-08-26T01:41:02+5:302017-08-26T01:42:38+5:30

वाशिम: ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टिकोनातून  जिल्हा पोलीस प्रशासनाने संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिले  आहेत. या क्रमांकावर कुणालाही केव्हाही तक्रार नोंदविता येणार  आहे. या तक्रारीनुसार कार्यवाही केली जाणार आहे.

Contact numbers can be reported on anti-noise pollution! | संपर्क क्रमांकावर नोंदविता येणार ध्वनिप्रदूषणासंदर्भातील तक्रारी!

संपर्क क्रमांकावर नोंदविता येणार ध्वनिप्रदूषणासंदर्भातील तक्रारी!

Next
ठळक मुद्देतक्रार नोंदविण्याचे आवाहन पोलीस अधीक्षकांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टिकोनातून  जिल्हा पोलीस प्रशासनाने संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिले  आहेत. या क्रमांकावर कुणालाही केव्हाही तक्रार नोंदविता येणार  आहे. या तक्रारीनुसार कार्यवाही केली जाणार आहे.
ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस प्रशासनाने  जिल्ह्यात १६ ध्वनिप्रदूषण नियंत्रण प्राधिकारी नियुक्त केल्यानंतर,  तक्रार स्वीकारण्यासाठी संपर्क क्रमांकही जाहीर केले. कोणत्याही  ठिकाणी ध्वनिप्रदूषण होत असल्यास याबाबतची माहिती संबंधित  प्रदूषण नियंत्रण प्राधिकारी यांना द्यावी, असे आवाहन पोलीस  अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी केले.
ध्वनिप्रदूषण नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हास्तरावर  अपर पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे यांच्या अध्यक्षतेखाली  सनियंत्रण समिती स्थापन केली आहे तसेच पोलीस स्टेशननिहाय  अधिकारी नियुक्त केले आहेत. जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीचे  सदस्य हे गृह शाखेचे पोलीस उपाधीक्षक के. एच. धात्रक तर समि ती सचिव म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक  अधिकारी रा. म. वानखेडे हे  कामकाज पाहणार आहेत. ध्वनी  प्रदूषणासंदर्भातील तक्रारीकरिता ८६0५८७८२५४,  ८६0५१२६८५७ या क्रमांकावर एसएमएस पाठवावा, असे  आवाहन पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी केले. 
-

Web Title: Contact numbers can be reported on anti-noise pollution!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.