रिसोड शहरात दुषित पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 04:01 PM2019-04-06T16:01:49+5:302019-04-06T16:02:52+5:30
रिसोड (वाशिम) : नगर परिषदेच्यावतीने शहरात गेल्या दहा ते बारा दिवसांपासून नागरिकांना दुषित पाणी पुरवठा होत आहे. नळ योजनेद्वारे सोडण्यात येणारे पाणी पिवळ्या रंगाचे आणि गाळमिश्रीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड (वाशिम) : नगर परिषदेच्यावतीने शहरात गेल्या दहा ते बारा दिवसांपासून नागरिकांना दुषित पाणी पुरवठा होत आहे. नळ योजनेद्वारे सोडण्यात येणारे पाणी पिवळ्या रंगाचे आणि गाळमिश्रीत आहे. हे पाणी पिण्यास योग्य नसल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून, नगर परिषदेने याची दखल घेण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
रिसोड शहराला मालेगाव तालुक्यातील पाणीपुरवठा अडोळ प्रेकल्पावरील योजनेतून पाणी पुरवठा करण्यात येतो. या प्रकल्पात सद्यस्थितीत उन्हाळाभर पुरेल एवढा साठा असून, रिसोड शहरात व्यवस्थीत पाणी पुरवठाही केला जातो; परंतु गेल्या १० ते १२ दिवसांपासून नागरिकांच्या नळातून दुषित पाणी येत आहे. हे पाणी पिवळसर आणि गाळमिश्रीत आहे. त्यामुळे नागरिकांत भितीचे वातावरण तयार झाले आहे. हे पाणी पिण्यासाठी योग्य नसून, नागरिकांच्या पिण्यात आल्यास अतिसार किंवा मुत्राशयाच्या आजाराची लागणही यामुळे होण्याची शक्यता आहे. तथापि, नगरपरिषद प्रशासनाकडून अद्याप याची दखल घेऊन शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी कुठलाही उपाय करण्यात आलेला नाही. रिसोड शहरात सध्या नळाला सहा दिवसांनी पाणीपुरवठा शहरात नागरिकांना केला जात असून हेच पाणी त्यांना पिण्यास व वापरण्यास कमीत कमी सहा दिवस संकलन करून ठेवावे लागते अशातच असे पिवळे पाणी जर नागरिकांच्या नळाला आले तर त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण शकतो यावर त्वरित उपाय म्हणून नगर प्रशासन नगरपालिका प्रशासनाने यावर गांभीर्याने लक्ष घालणे आवश्यक असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत. दरम्यान, नळाला दुषित पाणी येत असल्यामुळे नागरिक पिण्यासाठी कॅनचे पाणी विकत घेत आहेत. त्यामुळे रिसोड शहरातील वॉटर फिल्टर प्लांटधारकांना सुगीचे दिवस आल्याचे दिसून येते. मध्यम आणि उच्चवर्गीय हा खर्च करू शकत असले तरी, गरीबांना मात्र हेच पाणी प्यावे लागत असल्याचेही दिसत आहे. (तालुका प्रतिनिधी)