जिल्हा रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन २४ तास सुरू ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:41 AM2021-04-16T04:41:54+5:302021-04-16T04:41:54+5:30
जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हाभरातून शेकडोंच्या संख्येने गोरगरीब रुग्ण उपचारासाठी येतात. सद्यस्थितीत रुग्णालयात सिटीस्कॅन मशीन ...
जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हाभरातून शेकडोंच्या संख्येने गोरगरीब रुग्ण उपचारासाठी येतात. सद्यस्थितीत रुग्णालयात सिटीस्कॅन मशीन उपलब्ध आहे. परंतु, ही मशीन सकाळी ८ ते १२ व सायंकाळी ४ ते ५ या अल्पवेळेतच रुग्णांसाठी उपलब्ध असते. सध्या जिल्ह्यात कोरोनाची स्थिती अतिशय गंभीर झाली असून या महामारीच्या काळामध्ये सदर मशीनची सुविधा २४ तास रुग्णसेवेत उपलब्ध असणे अतिआवश्यक आहे. जेणेकरून गोरगरीब रुग्णांना याचा लाभ घेता येईल व त्यांच्या पैशाची बचत होईल. प्रशासनाने ही बाब लक्षात घेवून गरजू रुग्णांना निकडीच्या उपचारासाठी मदत व्हावी व त्यांचे प्राण वाचावे, या दृष्टिकोनातून सदर सिटीस्कॅन मशीनची सुविधा २४ तास रुग्णसेवेत कार्यरत ठेवावी, अशी मागणी कल्ले यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सकांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.