‘नाफेड’चे खरेदी केंद्र ३१ मे नंतरही सुरू ठेवा!
By admin | Published: May 27, 2017 07:34 PM2017-05-27T19:34:36+5:302017-05-27T19:34:36+5:30
३१ मे पर्यंत शेतक-यांचा माल मोजून घेणे अशक्य असल्याने खरेदी केंद्र ३१ मे नंतरही सुरू ठेवावे, अशी गळ वाशिम बाजार समितीच्या संचालक मंडळाने जिल्हाधिका-यांकडे शनिवारी घातली.
वाशिम : जिल्ह्यातील वाशिम आणि अनसिंग येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील नाफेडच्या तूर खरेदी केंद्रांवर "टोकन"व्दारे नोंद झालेल्या शेतक-यांची संख्या अधिक आहे. ३१ मे पर्यंत संबंधित शेतक-यांचा माल मोजून घेणे अशक्य असल्याने खरेदी केंद्र ३१ मे नंतरही सुरू ठेवावे, अशी गळ वाशिम बाजार समितीच्या संचालक मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे शनिवारी घातली.
वाशिमच्या बाजार समितीने १५ मे पासून ६२०० शेतक-यांना; तर अनसिंगच्या बाजार समितीने १६६२ शेतकऱ्यांना टोकन दिले आहे. त्यापैकी २७ मे पर्यंत केवळ ५६२ शेतकऱ्यांच्या ७ हजार ८०० क्विंटल मालाचीच मोजणी होऊ शकली. त्यामुळे ३१ मे पर्यंत उर्वरित शेतकऱ्यांचा माल मोजून घेणे, त्यांना चुकारे अदा करणे शक्यच नसल्याने ही मुदत वाढवून देण्याची मागणी बाजार समितीच्या संचालक मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.