चौथ्या दिवशीही जिल्ह्यात संततधार पाऊस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:28 AM2021-07-15T04:28:10+5:302021-07-15T04:28:10+5:30

वाशिम: सलग चौथ्या दिवशीही कमी-अधिक प्रमाणात जिल्ह्यात पाऊस झाला असून, यामुळे शेतकरी सुखावला आहे. पावसामुळे दिलासा मिळाला, अशा प्रतिक्रिया ...

Continuous rain in the district even on the fourth day! | चौथ्या दिवशीही जिल्ह्यात संततधार पाऊस !

चौथ्या दिवशीही जिल्ह्यात संततधार पाऊस !

googlenewsNext

वाशिम: सलग चौथ्या दिवशीही कमी-अधिक प्रमाणात जिल्ह्यात पाऊस झाला असून, यामुळे शेतकरी सुखावला आहे. पावसामुळे दिलासा मिळाला, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत आहेत.

यंदा चार लाख हेक्टरवर खरीप पिकाच्या पेरणीचे नियोजन कृषी विभागाने केले. आतापर्यंत ९८ टक्के क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे. यंदा सर्वाधिक पेरा सोयाबीनचा झाला आहे. त्याखालोखाल तूर, कपाशी, मूग, उडीद आदी पिकांचा पेरा आहे. गेल्या वर्षीदेखील पेरणीनंतर पावसात सातत्य नसल्याने शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागले होते.यंदाही पेरणी आटोपल्यानंतर जवळपास १० ते १२ दिवस पावसाने दडी मारली होती. त्यानंतर अधूनमधून पाऊस झाल्याने पिकांना संजीवनी मिळत गेली. गत चार दिवसांपासून जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत असल्याने पिकांना चांगलीच संजीवनी मिळत आहे. नदीकाठच्या शेतात पाणी साचत असल्याने काही शेतकऱ्यांना पीक नुकसानीसदेखील सामोरे जावे लागत आहे. नुकसानग्रस्त भागाचे सर्वेक्षण करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

०००००००

पिकांची वाढ जोमाने होणार !

गत चार दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत असल्याने पिकांना संजीवनी मिळाली; यासोबत पिकांची वाढ जोमाने होण्याचा आशावाद शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

००

तालुकापाऊस (मिमी)

वाशिम२४.७०

रिसोड१६.२०

मालेगाव२७.५०

मं.पीर१५.८०

मानोरा१४.००

कारंजा ०५.४०

Web Title: Continuous rain in the district even on the fourth day!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.