महावितरणमधील कंत्राटी कामगारांनी पुकारला एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:33 AM2021-01-14T04:33:44+5:302021-01-14T04:33:44+5:30
यासंदर्भात महावितरणमधील कंत्राटी कामगारांनी वरिष्ठांकडे सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, कोणतेही कारण नसताना कामगार पुरविणाऱ्या एजन्सीने अनेक ...
यासंदर्भात महावितरणमधील कंत्राटी कामगारांनी वरिष्ठांकडे सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, कोणतेही कारण नसताना कामगार पुरविणाऱ्या एजन्सीने अनेक कामगारांना कामावरून कमी केले आहे. संबंधित कंत्राटी कामगारांना त्वरित पूर्वीप्रमाणे कामावर घेण्यात यावे, संबंधितांना नियमित व नियमाप्रमाणे वेतन अदा करावे, नियमित पीएफ व इतर देणी तत्काळ अदा करावी, मिळत असलेल्या वेतनाची स्लीप देण्यात यावी, कंत्राटी कामगारांचे वेतन ७ तारखेच्या आत करण्यात यावे आदी मागण्यांसाठी आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन तांत्रिक ॲप्रेंटिस कंत्राटी कामगार असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष शाम भारती, जिल्हा सचिव गजानन खंदारे, सदाशिव भुसारे, भगवान मुसळे यांनी केले आहे.
......................
नांदेड येथील अल्फा एन्टरप्राईजेस या एजन्सीने जुन्या बाह्यस्रोत कार्यरत कंत्राटी कामगारांना पूर्व सूचना, लेखी व संदेश न देता संपर्क पोर्टलवरून व कामावरून कमी केल्यामुळे कामगारांनी आमरण उपोषणाला प्रारंभ केला आहे. यामध्ये सागर मानकर, प्रसाद राजे, विनोद भोयर, नितीन गवळी, गणेश भुसारी, गोपाल टोंचर यांच्यासह बहुसंख्य कामगारांचा समावेश आहे. या कामगारांनी पूर्ववत कामावर घेणे, संपर्क पोर्टलवर नाव समाविष्ट करणे, वेतन ७ तारखेच्या आत करणे व पी.एफ. वेळेवर पूर्ण भरणे, कंत्राटी कामगार यांना सहायक अभियंता व उपकार्यकारी अभियंता यांच्या लेखी तक्रारीशिवाय कामावरून कमी करू नये. अशा प्रकारच्या विविध मागण्या उपोषणकर्त्यांनी केल्या आहेत.