बांधकामाचे देयक मिळण्यासाठी कंत्राटदाराचे उपोषण
By admin | Published: May 12, 2017 01:33 PM2017-05-12T13:33:46+5:302017-05-12T13:33:46+5:30
ब्रह्मा ग्रामपंचायतसमोर कंत्राटदार गजानन पंढरीनाथ मुसळे यांनी उपोषण सुरू केले आहे.
देपूळ (वाशिम) : तिर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत जगदंबा देवी देवस्थानच्या कुंपन भिंतीचे काम पूर्ण करुन व एम.बी.झालेली असतानाही या कामाचे देयक देण्यास ब्रम्हा ग्रामपंचायत टाळाटाळ करीत आहे. देयक मिळण्याच्या मागणीसाठी ब्रह्मा ग्रामपंचायतसमोर कंत्राटदार गजानन पंढरीनाथ मुसळे यांनी उपोषण सुरू केले आहे.
ब्रम्हा येथील जगदंबा देवी देवस्थानला कुंपण भिंतीसाठी तिर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत ८ लाखाचा निधी मंजुर झालेला आहे. सदर काम पूर्ण झाले असून, या कामाचे मोजमापही झाले आहे. या कामाचा ८० टक्के निधी दिड महिन्यापुर्वी ग्रामपंचायतमध्ये जमा झाला. पंरतु ग्रामपंचायतने अद्याप देयक दिले नाही. देयक मिळाण्याच्या मागणीसाठी गजानन मुसळे यांनी उपोषणाला सुरूवात केली.