महावितरणच्या कामावर कंत्राटदारांचा बहीष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 01:49 PM2018-06-10T13:49:57+5:302018-06-10T13:49:57+5:30

काम करणे परवडत नसल्याने वाशिम जिल्हा इलेक्ट्रीकल कॉन्टॅक्टर असोसिएशने अध्यक्ष संजय मिसाळ यांनी महावितरणच्या कामावर बहिष्कार टाकण्यासंदर्भात  अधिक्षक अभियंता यांना निवेदन दिल्ो आहे.

Contractor's boycott on the work of MSEDCL | महावितरणच्या कामावर कंत्राटदारांचा बहीष्कार

महावितरणच्या कामावर कंत्राटदारांचा बहीष्कार

Next
ठळक मुद्देबाजारातील दर व विज वितरण कंपनीकडून देण्यात येणाºया दरामध्ये मोठी तफावत आहे. निविदांमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय संघटनेच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला आहे. स्पेशल पॅकेज अंतर्गत, कृ षीपंपाची कामे, विशेष घटक योजनेंतर्गत होणारी कामे ठप्प होण्याची दाट शक्यता आहे.


मंगरुळपीर   : महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीकडे काम करणाऱ्या कंत्राटदारांना निविदेमध्ये देण्यात येणाऱ्या साहीत्याचे दर आणि प्रत्यक्ष बाजारात मिळणाऱ्या साहित्याचे दर यात मोठी तफावत असल्याने काम करणे परवडत नसल्याने वाशिम जिल्हा इलेक्ट्रीकल कॉन्टॅक्टर असोसिएशने अध्यक्ष संजय मिसाळ यांनी महावितरणच्या कामावर बहिष्कार टाकण्यासंदर्भात  अधिक्षक अभियंता यांना निवेदन दिल्ो आहे.
या बहिष्कारामुळे वाशिम जिल्ह्यातील महावितरणची कामे रखडण्याची शक्यता आहे. विज वितरण कंपनीमार्फत स्पेशल पॅकेज अंतर्गत, कृ षीपंपाची कामे, विशेष घटक योजनेंतर्गत होणारी कामे ठप्प होण्याची दाट शक्यता आहे. बाजारातील दर व विज वितरण कंपनीकडून देण्यात येणाºया दरामध्ये मोठी तफावत आहे. 
त्यामुळे काम करणे कंत्राटदारांना परवडणारी नसुन कंपनीने केलेल्या दरातील वाढ नगण्य असुन ती परवडणारी नसुन त्यामुळे नुकत्याच प्रसिध्द झालेल्या निविदांमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय संघटनेच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला आहे. त्यामुळे कोणत्याही कंत्राटदाराने निविदा न भरण्याचे आवाहन संघटनेच्यावतीने करण्यात येत आहे. संपूर्ण राज्यातच महावितरणाच्या कामाच्या निविदेवर राज्यभरातील कंत्राटदाराने बहीष्कार टाकलेला आहे. 
शासनाने कृषीपांचा विज जोडणीसाठी लागणाºया साहित्याची बाजारभाव व कंपनीच्या ठरविलेल्या साहित्याचे दरामध्ये प्रचंड तफावत असुन ही तफावत दुर करणे आवश्यक आहे त्याकरिता वरिष्ठ पातळीवर समिती नेमुन दरातील फरकाची पडताळणी करुन दर वाढविणे गरजेचे आहे.

Web Title: Contractor's boycott on the work of MSEDCL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.