‘आॅनलाईन’ अर्ज प्रक्रियेमुळे बोगस लाभार्थ्यांवर नियंत्रण; बोगस लाभाथींचे प्रमाण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 02:47 PM2017-12-27T14:47:30+5:302017-12-27T14:49:57+5:30

वाशिम: कृषी विभागांतर्गत राबविण्यात येणाºया किरकोळ लाभाच्या योजना शासनाने काही महिण्यांपूर्वी बंद करून ५० हजारांपेक्षा पुढच्या साहित्य खरेदीच्याच योजना सुरू ठेवल्या आहेत. याशिवाय ‘कॅशलेस’ प्रणालीनेच खरेदी-विक्रीचे व्यवहार ग्राह्य धरले जात असल्याने ज्या शेतकऱ्यांना  खरेच आवश्यकता आहे, असेच शेतकरी सद्या कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेत असून बोगस लाभार्थींचे प्रमाण अगदीच कमी झाल्याची माहिती सूत्रांनी बुधवारी दिली.

Control over bogus beneficiaries due to online application process; The number of bogus beneficiaries decreased | ‘आॅनलाईन’ अर्ज प्रक्रियेमुळे बोगस लाभार्थ्यांवर नियंत्रण; बोगस लाभाथींचे प्रमाण घटले

‘आॅनलाईन’ अर्ज प्रक्रियेमुळे बोगस लाभार्थ्यांवर नियंत्रण; बोगस लाभाथींचे प्रमाण घटले

Next
ठळक मुद्देआवश्यकता आहे, असेच शेतकरी सद्या कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेत असून बोगस लाभार्थींचे प्रमाण घटले.‘कॅशलेस’ प्रणालीच्या उदयामुळे आणि ‘आॅनलाईन’ अर्ज प्रक्रियेमुळे बोगस लाभार्थ्यांवर नियंत्रण मिळविणे बहुतांशी शक्य झाले आहे.कोट्यवधी रुपयांचा निधी कृषी विभागाकडे पडून असतानाही शेतकऱ्यांमधून योजनांचा लाभ घेण्यासाठी विशेष प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती सुत्रांनी दिली.

वाशिम: कृषी विभागांतर्गत राबविण्यात येणाºया किरकोळ लाभाच्या योजना शासनाने काही महिण्यांपूर्वी बंद करून ५० हजारांपेक्षा पुढच्या साहित्य खरेदीच्याच योजना सुरू ठेवल्या आहेत. याशिवाय ‘कॅशलेस’ प्रणालीनेच खरेदी-विक्रीचे व्यवहार ग्राह्य धरले जात असल्याने ज्या शेतकऱ्यांना  खरेच आवश्यकता आहे, असेच शेतकरी सद्या कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेत असून बोगस लाभार्थींचे प्रमाण अगदीच कमी झाल्याची माहिती सूत्रांनी बुधवारी दिली.
पुर्वी कृषी विभागाची कुठलीही योजना असो, त्यास शेतकºयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळायचा. किरकोळ लाभाच्या योजनांकरिता उद्दीष्ट कमी असतानाही मोठ्या प्रमाणात योजनांच्या लाभासाठी अर्ज सादर व्हायचे. यात खºया लाभार्थ्यांऐवजी बोगस लाभार्थ्यांचे प्रमाण अधिक राहायचे. त्यामुळेच योजनांतर्गत गैरप्रकाराचे प्रमाणही वाढले होते. दरम्यान, जानेवारी २०१७ पासून शासनस्तरावरून कृषी विभागाच्या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आला असून ‘कॅशलेस’ प्रणालीच्या उदयामुळे आणि ‘आॅनलाईन’ अर्ज प्रक्रियेमुळे बोगस लाभार्थ्यांवर नियंत्रण मिळविणे बहुतांशी शक्य झाले आहे. त्यामुळेच की काय कोट्यवधी रुपयांचा निधी कृषी विभागाकडे पडून असतानाही शेतकऱ्यांमधून योजनांचा लाभ घेण्यासाठी विशेष प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती सुत्रांनी दिली.

कृषी विभागाकडून विविध स्वरूपातील योजना राबविण्यात येत असून शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यायला हवा. आॅनलाईन अर्ज प्रक्रियेत अथवा ‘कॅशलेस’ प्रणालीव्दारे व्यवहार करित असताना कुठलीही अडचण आल्यास संपर्क साधावा. संबंधितांच्या अडचणींचे तत्काळ निराकरण करण्यात येईल.
- अभिजित देवगिरीकर, तालुका कृषी अधिकारी, वाशिम

Read in English

Web Title: Control over bogus beneficiaries due to online application process; The number of bogus beneficiaries decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम