पानटपऱ्या बंदमुळे थुंकण्यावर नियंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:31 AM2021-06-01T04:31:28+5:302021-06-01T04:31:28+5:30
................... जऊळका येथे कोरोनाविषयक मार्गदर्शन वाशिम : मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे येथे आरोग्य विभागाकडून सोमवारी कोरोनाविषयक मार्गदर्शन करण्यात आले. ...
...................
जऊळका येथे कोरोनाविषयक मार्गदर्शन
वाशिम : मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे येथे आरोग्य विभागाकडून सोमवारी कोरोनाविषयक मार्गदर्शन करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांनी कोरोना लस घेऊन सुरक्षित व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
.............
क्रीडांगणे बंदच राहणार, खेळाडू नाराज
वाशिम : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यात येत असून, क्रीडांगणे बंद आहेत. यापुढेही काही दिवस ही परिस्थिती कायम राहणार असल्याने खेळाडूंमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
.................
रिसोडची बाजारपेठ दुपारी निर्मनुष्य
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गावर नियंत्रण मिळविण्याकरिता, जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यास प्रतिसाद मिळत असून, रिसोड येथील बाजारपेठ सोमवारी निर्मनुष्य दिसून आली.
....................
शिथिलता मिळाल्याने ऑटोचालक समाधानी
वाशिम : जिल्हा प्रशासनाने ९ मेपासून लावलेल्या कडक निर्बंधातून ३१ मे रोजी काही अंशी शिथिलता प्रदान केली. १ जूनपासून दुपारी २ पर्यंत बाजारपेठ सुरू राहणार असल्याने प्रवाशी मिळणार, या अपेक्षेने ऑटोचालकांनी समाधान व्यक्त केले.
.....................
मधुमक्षिका पेट्या देण्याची मागणी
वाशिम : गतवर्षी कोरोना संकट उद्भवण्यापूर्वी बचतगटातील महिलांना मधुमक्षिका पेट्या मिळाल्या. मात्र, नंतर त्या परत घेण्यात आल्या. आता सदर पेट्या देण्याची मागणी होत आहे.
...............
जिल्ह्यात बायोगॅस प्रकल्प कार्यान्वित
वाशिम : जिल्ह्यात या वर्षी २६ बायोगॅस प्रकल्प उभारण्यात आले आहेत. ते पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाले असून, त्याचा वापरही सुरू झाल्याची माहिती कृषी विकास अधिकारी विकास बंडगर यांनी दिली.
..............
अंतर्गत रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी
वाशिम : शहरातील अंतर्गत रस्त्यांचे काही महिन्यांपूर्वी नूतनीकरण झाले. मात्र, अल्पावधीतच रस्ते खराब झाले आहे. काही रस्त्यांना खड्डे पडले असून, रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी होत आहे.
.............
वाशिममध्ये काही भागात कृत्रिम पाणीटंचाई
वाशिम : शहरातील काही भागांत गेल्या काही दिवसांपासून कृत्रिम पाणीटंचाई जाणवत आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून, नगरपरिषदेने लक्ष पुरवावे, अशी मागणी अविनाश मुळे यांनी निवेदनाद्वारे केली.
...........
वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण
वाशिम : वनविभागाच्या जमिनीवर काही ठिकाणी अतिक्रमण झाले असून, काही लोकांनी जमीन वहितीखाली आणली आहे. त्याचा शोध घेऊन अतिक्रमण हटवावे, अशी मागणी वृक्षप्रेमींमधून होत आहे.
.............
सौरऊर्जा वापराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
वाशिम : अपारंपरिक ऊर्जास्रोत म्हणून सौरऊर्जा वापरावर भर देण्याचे शासनाचे आदेश आहेत. मात्र, प्रशासकीय कार्यालयांमध्येच त्याचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे.
...............
रस्ता दुभाजक उभारण्याची मागणी
वाशिम : शहरातील पुसद नाक्यावर वाहतुकीची नियमित वर्दळ राहते. चारही दिशांनी दिवसभर वाहने सुसाट वेगात धावतात. यामुळे मुख्य चाैकात दर्जेदार दुभाजक उभारण्यात यावे, अशी मागणी प्रमोद बनसोड यांनी केली आहे.