कार्यक्रम सुरू झाल्याने कलावंतांची सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:27 AM2021-06-10T04:27:41+5:302021-06-10T04:27:41+5:30
.............. प्रवाशांनी खबरदारी बाळगण्याचे आवाहन वाशिम : खासगी वाहनांव्दारे ग्रामीण भागात प्रवास करीत असलेले अनेकजण खबरदारी बाळगत नसल्याचे दिसत ...
..............
प्रवाशांनी खबरदारी बाळगण्याचे आवाहन
वाशिम : खासगी वाहनांव्दारे ग्रामीण भागात प्रवास करीत असलेले अनेकजण खबरदारी बाळगत नसल्याचे दिसत आहे. यामुळे कोरोनाची लागण होऊ शकते. ही बाब लक्षात घेता खबरदारी बाळगण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
.............
वाहतूक सुरळीत करण्याची मागणी
वाशिम : शहरातील पाटणी चौक व रिसोड नाका येथे दिवसभरातून अनेकवेळा वाहतूक विस्कळीत होत आहे. त्याचा रहदारीलाही अडथळा निर्माण होत असून, ही समस्या सोडविण्याची मागणी गणेश मुळे यांनी बुधवारी पोलिसांकडे केली.
...................
ऑनलाईन प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन
वाशिम : मंगरूळपीर तालुक्यातील गावांमध्ये समृद्ध गाव स्पर्धा राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने ग्रामस्थांना ऑनलाईन प्रशिक्षण दिले जात असून, त्याचा लाभ घेण्याचे आवाहन अभियानाचे जिल्हा समन्वयक सुभाष नानवटे यांनी केले आहे.
..............
लक्षणे असल्यास तातडीने चाचणी करा!
वाशिम : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचे संकट ओसरत चालले आहे. असे असले, तरी नागरिकांनी गाफील न राहता काळजी घ्यावी. संसर्गाची लक्षणे दिसून आल्यास तातडीने चाचणी करावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी केले.
...................
पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याची मागणी
जऊळका रेल्वे : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या निर्बंधांतून शिथिलता मिळाल्यानंतर एक्स्प्रेस रेल्वे सुरू झाली; मात्र जऊळका रेल्वे स्थानकावर ही रेल्वे थांबत नाही. त्यामुळे पॅसेंजर सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
...............
लोखंडी बॅरिकेट्स हटविण्याची मागणी
वाशिम : शहरातील पाटणी चौक, रिसोड नाका, पाटणी कॉम्प्लेक्सनजीकच्या रस्त्यावर दुभाजक उभारण्याऐवजी लोखंडी बॅरिकेट्स उभे करण्यात आले. यामुळे अडचण निर्माण झाली असून, बॅरिकेट्स हटविण्याची मागणी होत आहे.
...................
हळद विक्रीसाठी बाजारपेठेचा अभाव
वाशिम : शिरपूर व परिसरात हळद उत्पादक शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. असे असताना हळद खरेदी व विक्री व्यवहारासाठी परिसरात बाजारपेठ नसल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे.
..................
रेशन दुकानांमध्ये नियमांचे पालन
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, ई-पास मशीनवर लाभार्थींचा अंगठा घेणे बंद करण्यात आले आहे. त्याऐवजी संबंधित दुकानदारांचा अंगठा ग्राह्य धरण्यात आला असून, नियमांचे पालन करत धान्य वितरण सुरू आहे.
.............
धूर फवारणी करण्याची मागणी
वाशिम : ग्रामीण भागात डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने डास प्रतिबंधक धूर फवारणी करणे गरजेचे आहे. याकडे जऊळका जिल्हा परिषद गटातील ग्रामपंचायतींनी लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी सोमवारी केली.
........................
पशुसंवर्धन विभागात वर्ग दोनची पदे रिक्त
वाशिम : पशुसंवर्धन विभागातील डॉक्टरांच्या रिक्त पदांचे ग्रहण पशुपालकांना आर्थिक संकटात ढकलत असल्याचे वास्तव आहे. श्रेणी एक व दोनच्या दवाखान्यातील तब्बल २३ डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत.
..................
वाशिम-अनसिंग रस्त्याचे काम संथ गतीने
वाशिम : वाशिम ते अनसिंग रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. रस्त्याची एक बाजू अनेक ठिकाणी खोदून ठेवल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. ही समस्या सोडवून रस्ता कामास गती द्यावी, अशी मागणी होत आहे.