स्वयंपाकी-मदतनिसांचे मानधन रखडले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 07:24 PM2017-08-04T19:24:30+5:302017-08-04T19:26:58+5:30

वाशिम : शालेय पोषण आहार शिजवून देणाºया स्वयंपाकी, मदतनिसांसह बचत गटांचे गत तीन महिन्यांपासूनचे मानधन रखडले आहे. सदर मानधन तातडीने देण्याची मागणी शालेय पोषण आहार स्वयंपाकी, मदतनीस, कामगार, बचत गट संघटनेने शुक्रवारी शासनाकडे केली आहे.

Cook-helpers have lost their money! | स्वयंपाकी-मदतनिसांचे मानधन रखडले !

स्वयंपाकी-मदतनिसांचे मानधन रखडले !

googlenewsNext
ठळक मुद्देशालेय पोषण आहारतीन महिन्यांपासूनचे मानधन रखडले तातडीने देण्याची मागणी संघटनेने शासनाकडे केली

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शालेय पोषण आहार शिजवून देणाºया स्वयंपाकी, मदतनिसांसह बचत गटांचे गत तीन महिन्यांपासूनचे मानधन रखडले आहे. सदर मानधन तातडीने देण्याची मागणी शालेय पोषण आहार स्वयंपाकी, मदतनीस, कामगार, बचत गट संघटनेने शुक्रवारी शासनाकडे केली आहे.
शालेय पोषण आहार शिजवून देण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी स्वयंपाकी व मदतनीस, बचत गटाचे सदस्य पार पाडतात. वाशिम जिल्ह्यात काही स्वयंपाकी व मदतनिसांचे मानधन मिळाले आहे तर बहुतांश स्वयंपाकी व मदतनिसांचे मानधन गत तीन महिन्यांपासून मिळाले नाही. सदर मानधन दरमहा १ तारखेला देण्याची मागणी शालेय पोषण आहार स्वयंपाकी, मदतनीस, कामगार, बचत गट संघटनेने केली आहे. याशिवाय अन्य मागण्यादेखील शासनदरबारी प्रलंबित आहेत. शालेय पोषण आहार योजनेंतर्गत काम करणाºयांना कायमस्वरुपी शिपाई-स्वयंपाकी या पदावर स्थायी आदेश देण्यात यावे, किमान १८ हजार रुपये मानधन देण्यात यावे, केंद्र शासनाने प्रतिदिन ३५० रुपये देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, पोषण आहार कर्मचाºयांना इंधन, स्वयंपाकी साहित्य शाळेत उपलब्ध करून देण्यात यावे, शालेय पोषण आहार कर्मचाºयांना स्वयंपाक व्यतिरिक्त कामाचा मोबदला देण्यात यावा, महाराष्ट्रातील काही स्वयंपाकी, मदतनीस यांना कामावरून कमी केले आहे, त्यांना पूर्ववत कामावर घेण्यात यावे, दिवाळी बोनस म्हणून दोन हजार रुपये देण्यात यावे, डाटा एन्ट्री आॅपरेटरला दरमहा १४६०० रुपये देण्यासाठी शासन निर्णय निर्गमीत करण्यात यावा तसेच शासकीय सेवेत कायम करण्यात यावे, बचत गटामार्फत रेशन दुकानात येणाºया वस्तू बचत गटामार्फत देण्यात याव्या व बचत गटाला दिलेले सर्व कर्ज माफ करण्यात यावे, आदी मागण्या शालेय पोषण आहार स्वयंपाकी, मदतनीस, कामगार, बचत गट संघटनेने केल्या आहेत, अशी माहिती रिसोड तालुकाध्यक्ष अरूण सरनाईक यांनी दिली.

Web Title: Cook-helpers have lost their money!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.