अपघातग्रस्ताला वेळीच उपचाराकरिता पाेलिसांचे सहकार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:46 AM2021-09-21T04:46:32+5:302021-09-21T04:46:32+5:30

कुत्तरडोह येथील रहिवासी देवआनंद रामदास ठाकरे (२७) हे आपल्या बहिणींना भेटण्याकरिता अंधारसांगवी येथे जात असतानी उमरवाडी फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीचा ...

The cooperation of the Paelis for the timely treatment of the injured | अपघातग्रस्ताला वेळीच उपचाराकरिता पाेलिसांचे सहकार्य

अपघातग्रस्ताला वेळीच उपचाराकरिता पाेलिसांचे सहकार्य

Next

कुत्तरडोह येथील रहिवासी देवआनंद रामदास ठाकरे (२७) हे आपल्या बहिणींना भेटण्याकरिता अंधारसांगवी येथे जात असतानी उमरवाडी फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. बेशुध्द अवस्थेत पडलेल्या ठाकरे यांना अनेकजण बघत हाेते, परंतु कुणी जवळ जायला तयार नव्हते . यावेळी उमरवाडीकडे जात असताना मेडशी येथील गोरखनाथ भागवत यांनी सदर घटनेची हकीकत मेडशी पोलीस चौकीवर कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील यांना भ्रमणध्वनीवरून सांगितली . पोलीस अमोल पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळ गाठले. ठाकरे यांना विजेंद्र इंगोले यांच्या सहाय्याने दुचाकीवर बसून प्रथम उपचारासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र मेडशी येथे आणले. त्यांना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार देऊन पुढील उपचाराकरिता वाशिम येथे पाठवण्यात आले.

Web Title: The cooperation of the Paelis for the timely treatment of the injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.