मंदिर परिसरात बोकड बळी देण्यास बंदी

By admin | Published: April 2, 2017 02:26 AM2017-04-02T02:26:29+5:302017-04-02T02:26:29+5:30

जगदंबा मंदिरासमोर बोकड बळी देण्याची प्रथा न्यायालयाच्या निकालानुसार बंद करण्यात आलेली आहे.

Cops are not allowed to make buck goats in the temple premises | मंदिर परिसरात बोकड बळी देण्यास बंदी

मंदिर परिसरात बोकड बळी देण्यास बंदी

Next

वाशिम, दि. १- मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथील जगदंबा मंदिरासमोर बोकड बळी देण्याची प्रथा न्यायालयाच्या निकालानुसार बंद करण्यात आलेली आहे. यात्रेमध्ये बोकड बळी प्रथेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न होऊ नये, याकरिता फौजदार प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये जगदंबा मंदिरासमोर तसेच २00 मीटर यात्रा परिसरात २७ मार्च ते ५ एप्रिल २0१७ या कालावधीत बोकड बळी देण्यावर तसेच जाणार्‍या-येणार्‍या लोकांना त्रास होईल, अशा रीतीने सार्वजनिक ठिकाणी प्राण्यांच्या कत्तलीवर निबर्ंध घालण्यात येत असल्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. मानोरा तालुक्यातील पोहरादेवी व उमरी खुर्द येथे २७ मार्च ते ५ एप्रिल २0१७ या कालावधीत बंजारा समाज बांधवांची मोठी यात्रा भरते.

Web Title: Cops are not allowed to make buck goats in the temple premises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.