कोरोनाबाधित दुपटीचा वेग २२८ दिवसांवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:56 AM2021-02-25T04:56:22+5:302021-02-25T04:56:22+5:30

जिल्ह्यात ३ एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. मे महिन्यापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात होती. त्यानंतर हळूहळू ...

Corona-bound double speed at 228 days! | कोरोनाबाधित दुपटीचा वेग २२८ दिवसांवर !

कोरोनाबाधित दुपटीचा वेग २२८ दिवसांवर !

Next

जिल्ह्यात ३ एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. मे महिन्यापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात होती. त्यानंतर हळूहळू रुग्णसंख्येत वाढ होत गेली. सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाला. या एका महिन्यात २६०० च्या वर कोरोनाबाधित आढळून आले तसेच ६० च्या आसपास रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सप्टेंबरनंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत गेली. जानेवारी महिन्यापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार दिसून येत आहे. दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात गत आठवड्यापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसून येते. १७ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी या सात दिवसात जिल्ह्यात ५४९ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे रुग्ण दुपटीचा वेग ३२४ दिवसांवरून २२८ दिवसांवर आला आहे. ही बाब जिल्हावासीयांची डोकेदुखी वाढविणारी ठरत आहे.

बॉक्स

मागील सात दिवसांत आढळून आलेले रुग्ण

१७ फेब्रुवारी ४३

१८ फेब्रुवारी ४१

१९ फेब्रुवारी ९८

२० फेब्रुवारी ९३

२१ फेब्रुवारी १२५

२२ फेब्रुवारी ६२

२३ फेब्रुवारी ८७

००००

बॉक्स

सध्या कोरोनाबाधित दुपटीचा वेग - २२८ दिवस

यापूर्वी असलेला दुपटीचा वेग - ३२४ दिवस

००००

बॉक्स

एकूण पॉझिटिव्ह - ७९२२

अ‍ॅक्टिव्ह - ६०३

डिस्चार्ज - ७१६२

मृत्यू - १५६

००००००००

कोट बॉक्स

गत आठ दिवसापासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. सध्या कोरोना रुग्ण दुपटीचा वेग २२८ दिवसांवर गेला असून, यापूर्वी हा वेग ३२४ दिवस असा होता. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.

- डॉ. अविनाश आहेर,

जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम.

Web Title: Corona-bound double speed at 228 days!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.