Corona Cases in Washim : आणखी १३ जणांचा मृत्यू; २७० पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 11:23 AM2021-05-24T11:23:24+5:302021-05-24T11:23:38+5:30
Corona Cases in Washim: १३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली, तर २७० जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात मृत्यूसत्र कायम असून रविवार, २३ मे रोजी आणखी १३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली, तर २७० जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ३८२४१ वर पोहोचला आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ-उतार दिसून येत आहेत. मृत्यूसत्रही कायम असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. रविवारच्या अहवालानुसार कारंजा तालुक्यात सर्वाधिक ८१ तर सर्वात कमी रुग्ण मानोरा तालुक्यात २० आढळून आले. दुसरीकडे नव्याने कोरोना रुग्ण आढळून येत असले तरी कोरोनावर मात करणाºयांची संख्यादेखील वाढत असल्याचे दिसून येते.
रविवाारी नव्याने २७० रुग्ण आढळून आले तर ६५६ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्याबाहेरील १७ बाधितांची नोंद झाली आहे. कोरोनाबाधितांचा आलेख खाली येत असला तरी धोका अजून संपलेला नाही. त्यामुळे प्रत्येकाने सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले.