Corona Cases in Washim : ३९ जणांची कोरोनावर मात; १७ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 05:49 PM2021-06-30T17:49:56+5:302021-06-30T17:50:07+5:30

Corona Cases in Washim: ३० जून रोजी ३९ जणांनी कोरोनावर मात केली तर १७ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.

Corona Cases in Washim: 39 defeated in Corona; 17 Positive | Corona Cases in Washim : ३९ जणांची कोरोनावर मात; १७ पॉझिटिव्ह

Corona Cases in Washim : ३९ जणांची कोरोनावर मात; १७ पॉझिटिव्ह

googlenewsNext

वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा आलेख खाली येत असून बुधवार, ३० जून रोजी ३९ जणांनी कोरोनावर मात केली तर १७ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४१,४१४ वर पोहोचला आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अतिशय घटले असून, कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्यादेखील वाढत असल्याचे चित्र आहे. बुधवारी नव्याने १७ रुग्ण आढळून आले तर ३९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. कारंजा तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. रिसोड तालुक्यात ५, वाशिम तालुक्यात २, मंगरूळपीर तालुक्यात ४, मालेगाव तालुक्यात ३, मानोरा तालुक्यात ३ असे रुग्ण आढळून आले. आतापर्यंत ४१,४१४ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४०६०७ रुग्णांनी कोरोनावर मात केली.
 
१८७ सक्रिय रुग्ण
बुधवारच्या अहवालानुसार नव्याने १७ रुग्ण आढळून आले तर ३९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सरकारी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल, खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरणात असे एकूण १८७ रुग्ण सक्रिय आहेत.
 
वाशिम शहरात एक रुग्ण आढळला
बुधवारच्या अहवालानुसार वाशिम शहरात एक तर ग्रामीण भागात एक रुग्ण आढळून आला. रिसोड शहरात एक तर ग्रामीण भागात चार रुग्ण, मालेगाव शहरात एक तर ग्रामीण भागात दोन रुग्ण, मंगरूळपीर शहरात एक तर ग्रामीण भागात तीन रुग्ण, मानोरा शहरात एक तर ग्रामीण भागात दोन रुग्ण आढळून आले.

Web Title: Corona Cases in Washim: 39 defeated in Corona; 17 Positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.