Corona Cases in Washim : ९ पॉझिटिव्ह; १० जणांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 05:37 PM2021-07-07T17:37:02+5:302021-07-07T17:37:13+5:30

Corona Cases in Washim: ७ जुलै रोजी १० जणांनी कोरोनावर मात केली तर ९ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.

Corona Cases in Washim: 9 Positive; 10 people beat Corona | Corona Cases in Washim : ९ पॉझिटिव्ह; १० जणांची कोरोनावर मात

Corona Cases in Washim : ९ पॉझिटिव्ह; १० जणांची कोरोनावर मात

googlenewsNext

वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा आलेख खाली येत असून बुधवार, ७ जुलै रोजी १० जणांनी कोरोनावर मात केली तर ९ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४१,५१५ वर पोहोचला आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अतिशय घटले असून, कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्यादेखील वाढत असल्याचे चित्र आहे. बुधवारी नव्याने ९ रुग्ण आढळून आले तर १० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. वाशिम शहर तसेच रिसोड व मानोरा तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही.आतापर्यंत ४१५१५ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४०७६८ रुग्णांनी कोरोनावर मात केली तर आतापर्यंंत ६२१ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्याबाहेरील एका बाधिताची नोंद झाली आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसºया लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले.
 
१२५ सक्रिय रुग्ण
बुधवारच्या अहवालानुसार नव्याने ९ रुग्ण आढळून आले तर १० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सरकारी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरणात असे एकूण १२५ रुग्ण सक्रिय आहेत.
 
वाशिम शहर निरंक
बुधवारच्या अहवालानुसार वाशिम शहरात एकही रुग्ण आढळून आला नाही. तालुक्यात कोंडाळा झामरे येथे एक रुग्ण आढळून आला. मालेगाव शहरात एक तर ग्रामीण भागात एकही रुग्ण आढळून आला नाही. मंगरूळपीर शहरात दोन व ग्रामीण भागात एक तर कारंजा शहरात दोन व ग्रामीण भागात एक रुग्ण आढळून आला.

Web Title: Corona Cases in Washim: 9 Positive; 10 people beat Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.