Corona cases in Washim : २० जणांची कोरोनावर मात; ९ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 12:13 PM2021-07-07T12:13:07+5:302021-07-07T12:13:12+5:30
Corona cases in Washim : ७ जुलै रोजी २० जणांनी कोरोनावर मात केली तर ९ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.
वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा आलेख खाली येत असून मंगळवार, ७ जुलै रोजी २० जणांनी कोरोनावर मात केली तर ९ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४१,५०६ वर पोहोचला आहे. दरम्यान आणखी एका जणाचा मृत्यू झाल्याची नोंद मंगळवारी घेण्यात आली.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अतिशय घटले असून, कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्यादेखील वाढत असल्याचे चित्र आहे. मंगळवारी नव्याने ९ रुग्ण आढळून आले तर २० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आणखी एका जणाचा मृत्यू झाल्याची नोंद मंगळवारी घेण्यात आली. मालेगाव व कारंजा शहर तसेच रिसोड, कारंजा व मानोरा तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. वाशिम तालुक्यात २, मंगरूळपीर तालुक्यात ३, मालेगाव तालुक्यात ३ रुग्ण आढळून आले. आतापर्यंत ४१५०६ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४०७५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली तर आतापर्यंंत ६२१ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्याबाहेरील २ बाधितांची नोंद झाली आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसºया लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, घराबाहेर पडताना नेहमी मास्कचा वापर करावा, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले.