Corona Cases in Washim : आणखी एकाचा मृत्यू; २६२ नव्याने पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 11:29 AM2021-04-04T11:29:45+5:302021-04-04T11:29:56+5:30
Corona Cases in Washim: बाधितांचा एकूण आकडा आता १६ हजार ९६१वर पोहोचला असून, मृतकांचा एकूण आकडा १८९ झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाची बाधा झालेल्या एका इसमाचा आज मृत्यू झाला; तर नव्याने २६२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. बाधितांचा एकूण आकडा आता १६ हजार ९६१वर पोहोचला असून, मृतकांचा एकूण आकडा १८९ झाला आहे.
आरोग्य विभागाकडून शनिवारी प्राप्त अहवालानुसार, वाशिम शहरातील आययुडीपी कॉलनी -५, प्रशासकीय इमारत परिसरातील ८, लाखाळा -७, पोलीस वसाहत -४, अल्लाडा प्लॉट -२, योजना पार्क -२, सिव्हिल लाइन्स -६, पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरातील २, नवोदय विद्यालय परिसरातील २, दत्तनगर -१, शुक्रवार पेठ -२, गजानननगर -२, गोटे कॉलेज परिसरातील १, गोंदेश्वर -१, नगर परिषद परिसरातील १, तिरुपती सिटी परिसरातील १, शिवाजीनगर -१, सामान्य रुग्णालय परिसरातील १, पोलीस स्टेशन परिसरातील १, गोपाळ टॉकीज परिसरातील १, बागवानपुरा -१, सुंदरवाटिका -१, नंदीपेठ -१, रिसोड नाका परिसरातील ३, अकोलारोड परिसरातील १, शासकीय निवासस्थान परिसरातील १, विठ्ठलवाडी परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे २, जयपूर -१, उकळीपेन -३३, पंचाळा -१४, सुरकुंडी -१, तोंडगाव -२, अडोळी -६, सावळी -१, अनसिंग -३, उमरा कापसे -१, शेलू बु. -१, गव्हा -५, बोराळा -१, कार्ली -१, दोडकी -१०, रिसोड शहरातील शिवानीनगर -१, सिव्हिल लाइन्स -१, रामनगर -१, धनगर गल्ली -१०, आसनगल्ली -१, वाणी गल्ली -१, देशमुख गल्ली -१, शहरातील इतर ठिकाणचे ४, चिखली -५, गोभणी -१, निजामपूर -१, नावली -९, महागाव -१, मसला पेन -१, येवता -२, मोहजा -१, जोगेश्वरी -१, मोठेगाव -२, नंधाना -१, आंचळ -२, रिठद -१, मालेगाव शहरातील ३, जऊळका -१, शिरपूर -२, पिंपळा -१, शेलगाव -१, चांडस -३, आमखेडा -१, मंगरूळपीर शहरातील हुडको कॉलनी -१, न्यू जनता बँक परिसरातील १, मंगलधाम -१, शहरातील इतर ठिकाणचे ५, कोठारी -४, बोरवा -२, नवीन सोनखास -१, तऱ्हाळा -१, गिंभा -१, वनोजा -१, चोरद -१, कारंजा शहरातील संतोषी माता कॉलनी -१, डफनीपुरा -१, बसस्थानक रोड परिसरातील १, प्रगतीनगर -१, मोहननगर -१, रमाई कॉलनी परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे २, सोमठाणा -१, कामरगाव -१, तुळजापूर -१, धामणी खडी -१, वाई -१, किन्ही -१, दुधोरा -१, जनुना -१, मोहगव्हाण -२, मानोरा शहरातील एमएसईबी परिसरातील १, दिग्रस चौक -१, गव्हा -६, सुकळी -१, वरोली -२, हिवरा -१, असोला खु. -२, कोंडोली -१, शेंदूरजना -१, उमरी -१ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील सहा बाधितांची नोंद झाली असून, २४४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या १६,९६१ वर पोहोचली आहे.
(प्रतिनिधी)