Corona Cases in Washim : आणखी एकाचा मृत्यू; ८८ कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2021 12:30 PM2021-06-07T12:30:03+5:302021-06-07T12:30:28+5:30
Corona Cases in Washim : रविवार, ६ जून रोजी आणखी एका जणाच्या मृत्यूची नोंद झाली, तर ८८ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा आलेख खाली येत असून, कोरोनाबळींची संख्याही कमी होत असल्याचे दिसून येते. रविवार, ६ जून रोजी आणखी एका जणाच्या मृत्यूची नोंद झाली, तर ८८ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४०६१६ वर पोहोचला आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिसून येते. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येत आहे तर दुसरीकडे कोरोनावर मात करणाºयांची संख्यादेखील वाढत असल्याचे आशादायी चित्र आहे. मृत्यूसंख्येतही घट येत असल्याचे आशादायी चित्र आहे. रविवारी आणखी एका जणाचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली. रविवारी नव्याने ८८ रुग्ण आढळून आले तर २०७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्याबाहेरील १३ बाधितांची नोंद झाली आहे. मानोरा तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नसल्याची नोंद रविवारच्या अहवालात घेण्यात आली. आतापर्यंत कोरोनामुळे ५९१ जणांचा मृत्यू झाला तर ३९०४० जणांनी कोरोनावर मात केली. कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाने केले.