Corona Cases in Washim : आणखी दोघांचा मृत्यू; १०८ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 11:07 AM2021-05-31T11:07:22+5:302021-05-31T11:07:29+5:30

Corona Cases in Washim: आणखी दोनजणांच्या मृत्यूची नोंद झाली, तर १०८ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.

Corona Cases in Washim: Death of two more; 108 corona positive | Corona Cases in Washim : आणखी दोघांचा मृत्यू; १०८ कोरोना पॉझिटिव्ह

Corona Cases in Washim : आणखी दोघांचा मृत्यू; १०८ कोरोना पॉझिटिव्ह

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा आलेख खाली येत असून, रविवारी (दि. ३० मे) आणखी दोनजणांच्या मृत्यूची नोंद झाली, तर १०८ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ३९९४९ वर पोहोचला आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिसून येते. मात्र, मृत्युसत्र कायम असल्याने नागरिकांमध्ये थोडी धाकधूक कायम आहे. आणखी दोनजणांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाल्याची नोंद रविवारी घेण्यात आली. दुसरीकडे नव्याने कोरोना रुग्ण आढळून येत असले तरी कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्यादेखील वाढत असल्याचे दिसून येते. रविवारी नव्याने १०८ रुग्ण आढळून आले, तर १२४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सर्वाधिक रुग्ण कारंजा तालुक्यात २४, तर सर्वांत कमी रुग्ण रिसोड तालुक्यात आठ आढळून आले. जिल्ह्याबाहेरील ११ बाधितांची नोंद झाली आहे. आतापर्यंत ४५७ जणांचा मृत्यू झाला. कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाने केले.

Web Title: Corona Cases in Washim: Death of two more; 108 corona positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.