Corona Cases in Washim : आणखी सात जणांचा मृत्यू; ४२८ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 10:37 AM2021-05-13T10:37:00+5:302021-05-13T10:37:09+5:30
Corona Cases in Washim: सात जणांच्या मृत्यूची नोंद झाली, तर ४२८ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, बुधवार, १२ मे रोजी आणखी सात जणांच्या मृत्यूची नोंद झाली, तर ४२८ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ३३४४१ वर पोहोचला आहे.
जिल्ह्यात मृत्यूसत्र सुरूच असल्याने नागरिकांची चिंता अधिकच वाढत आहे. गत २४ तासांत आणखी सात जणांचा मृत्यू झाल्याची नोंद बुधवारी घेण्यात आली. बुधवारी प्राप्त अहवालानुसार मालेगाव तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात एकूण ४२८ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. वाशिम तालुक्यात १०२, मालेगाव तालुक्यातील १०६, रिसोड तालुक्यातील ८५, मंगरूळपीर तालुक्यातील ३५, कारंजा तालुक्यातील ६४ आणि मानोरा तालुक्यात ६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्याबाहेरील ३० बाधितांची नोंद झाली असून ४२४ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे.