Corona Cases in Washim : आणखी सहा जणांचा मृत्यू, ४७२ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 11:34 AM2021-05-11T11:34:21+5:302021-05-11T11:34:28+5:30

Corona Cases in Washim: आणखी सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली, तर ४७२ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.

Corona Cases in Washim: Six more killed, 472 positive | Corona Cases in Washim : आणखी सहा जणांचा मृत्यू, ४७२ पॉझिटिव्ह

Corona Cases in Washim : आणखी सहा जणांचा मृत्यू, ४७२ पॉझिटिव्ह

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, सोमवार, १० मे रोजी आणखी सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली, तर ४७२ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ३२,५४६ वर पोहोचला आहे.
वाढीव कोरोना चाचण्यांच्या तुलनेत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या स्थिर असली तरी, कोरोनाचा आलेख खाली येत नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच वाशिम शहरासह तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सोमवारीदेखील वाशिम तालुक्यात १७६ जण कोरोनाबाधित आढळून आले. जिल्ह्यात आणखी सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद सोमवारी घेण्यात आली. एकूण ४७२ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. वाशिम १७६, मालेगाव तालुक्यातील ६०, रिसोड तालुक्यातील ४५, मंगरुळपीर तालुक्यातील २६, कारंजा तालुक्यातील ५१ आणि मानोरा तालुक्यात ८० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्याबाहेरील ३४ बाधितांची नोंद झाली असून, ४२८ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 
 

Web Title: Corona Cases in Washim: Six more killed, 472 positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.