कोरोनाने हिरावली २३ बालकांची आई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:53 AM2021-06-16T04:53:14+5:302021-06-16T04:53:14+5:30

संतोष वानखडे वाशिम : गत तीन महिन्यांच्या कालावधीत कोरोनाने अनेकांना दु:खद धक्के दिले. कुणाचा भाऊ/बहिणी हिरावले, कुणाचे बाबा, कुणाचे ...

Corona deprives mother of 23 children | कोरोनाने हिरावली २३ बालकांची आई

कोरोनाने हिरावली २३ बालकांची आई

Next

संतोष वानखडे

वाशिम : गत तीन महिन्यांच्या कालावधीत कोरोनाने अनेकांना दु:खद धक्के दिले. कुणाचा भाऊ/बहिणी हिरावले, कुणाचे बाबा, कुणाचे आजी/आजोबा तर कुणाची आई हिरावली. आईविना बालकांच्या पालनपोषणाची कल्पनाही करता येत नाही. आतापर्यंतच्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील २३ बालकांची आई कोरोनाने हिरावली असून, या बालकांचा सांभाळ करताना बाबांना (वडील) तारेवरची कसरत करावी लागत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जनजीवन अधिक प्रभावित झाले. मार्च ते मे या तीन महिन्यात जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली. याच तीन महिन्यांत अनेकांना परिवारातील सदस्यही गमवावे लागले. कोरोना संसर्गामुळे दोन्ही पालक गमाविलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देऊन त्यांचे यथायोग्य संगोपन होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची जबाबदारी शासनाने जिल्हास्तरीय कृती दलावर सोपविली आहे. कोरोनामुळे आई-वडील दोघांचाही मृत्यू झाला असल्यास त्यांच्या पाल्याला मदत करण्याची घोषणा सरकारने केली. घरातील कर्ता पुरुष म्हणून वडिलांचा मृत्यू झाला असल्यास बालकांसाठी बाल संगोपन योजना व विधवा महिलासाठी निराधार योजनेतून लाभ दिला जातो. आईचा मृत्यू झाल्यास बालकासाठी बालसंगोपन योजनेचा लाभ लागू होऊ शकतो. परंतु, पुरुषाला अर्थसाहाय्य देणारी अन्य शासकीय योजना नाही. दुसरीकडे आईचा मृत्यू झाल्याने बालकाच्या पालनपोषण, संगोपनाचा, भावनिक जिव्हाळ्याचा प्रश्नही समोर येत आहे. कोरोनाने जिल्ह्यातील २३ बालकांची आई हिरावली आहे. आईविना या बालकांचे मायेचे छत्र हरविले असून, पालनपोषण करताना बाबांना मोठी कसरत करावी लागत आहे.

००००००

आई हिरावलेल्या बालकांची तालुकानिहाय माहिती

रिसोड ०४

मालेगाव ००

वाशिम ०८

मंगरूळपीर ०३

मानोरा ०५

कारंजा ०३

०००००००००

पुरुषांसाठीही योजना असावी !

घरातील कर्त्या पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्यास शासकीय निकषानुसार महिलेला शासनाच्या विविध योजनांचा लाभ दिला जाणार आहे. याच धर्तीवर घरातील कर्त्या महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्यास शासकीय निकषानुसार पुरुषाला शासकीय योजनांचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी समोर येत आहे.

.........

कोट बॉक्स

कोरोनामुळे आई-बाबा असे दोन्ही पालक किंवा एक पालक हिरावलेल्या बालकांचा सर्व्हे करण्यात येत आहे. आतापर्यंतच्या सर्व्हेनुसार जिल्ह्यातील २३ बालकांच्या आईचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. शासकीय निकषानुसार या बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न आहे.

- सुभाष राठोड

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, वाशिम

Web Title: Corona deprives mother of 23 children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.