Corona Efect : नवरात्राेत्सव मंडळांची संख्या३६ टक्क्यांनी घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 12:52 PM2020-10-17T12:52:10+5:302020-10-17T12:52:20+5:30
Navratri Festival in Washim यावर्षी २३० नवदुर्गा मंडळाच्यावतिने स्थापना करण्यात येणार आहे.
वाशिम : काेराेनाच्या पार्श्वभूमिवर दरवर्षी माेठया उत्साहात साजरा हाेणारा नवदुर्गा उत्सव यावर्षी अतिशय साध्या पध्दतीने साजरा हाेणार असल्याने नवदुर्गा स्थापन करणाऱ्या मंडळामध्ये ३६ टक्के घट दिसून येत आहे. २०१९ मध्ये जिल्हयात ग्रामीण व शहरी भागात एकूण ३४६ नवदुर्गाची स्थापना करण्यात आली हाेती. यावर्षी २३० नवदुर्गा मंडळाच्यावतिने स्थापना करण्यात येणार आहे.
२०१९ मध्ये वाशिम तालुक्यात शहरी भागात ४६ तर ग्रामीण भागात २९ असे एकूण ७५, मानाेरा तालुक्यात शहरी ८ व ग्रामाीण ३१ असे ३९, मंगरुळपीर तालुक्यात शहरी १५ तर ग्रामीण २६ असे ४१,कारंजा शहरी भागात ३४ तर ग्रामीण भाागत ५३ असे एकूण ८७, रिसाेड २३ शहरी तर २८ ग्रामीण असे ५१ व मालेगाव तालुक्यात शहरी १० तर ग्रामीण ४१ असे ५१ नवदुर्गा मंडळांनी स्थापना केली हाेती.
यावषी वाशिम तालुक्यात शहरी व ग्रामीण ७०, मानाेरा १५, मंगरुळ ४१, कारंजा ६०, रिसाेड १७ तर मालेगाव तालुक्यात २७ असे एकूण २३० नवदुर्गा मंडळे नवदुर्गा स्थापना करणार आहेत. साध्या पध्दतीने नवदुगा उत्सव साजरा हाेणार असल्याने तसेच प्रशासनाच्या नियमांमुळे अनेक मंडळांनी नवदुर्गा स्थापन न करण्याचा निर्णय घेतला.