राजुरा येथे ५९ जणांची कोरोना तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:42 AM2021-03-27T04:42:43+5:302021-03-27T04:42:43+5:30
गत आठवडाभरात गावात आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या बघता ग्रामपंचायत प्रशासनाने पुढाकार घेत आरोग्य विभागाच्या वरिष्ठाशी संपर्क साधून ...
गत आठवडाभरात गावात आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या बघता ग्रामपंचायत प्रशासनाने पुढाकार घेत आरोग्य विभागाच्या वरिष्ठाशी संपर्क साधून गावात कोरोना तपासणी शिबिर आयोजित करण्याची मागणी केली होती, त्यानुसार ग्रामपंचायत कार्यालयात कोरोना चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये मेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शीतल शेगावकर यांनी ५९ जणांचे कोरोना चाचणी नमुने घेतले, त्यांना आरोग्य सेविका जयश्री धांदु, कंत्राटी आरोग्य सेविका रेखा भोंबळे, आरोग्य सेवक अंनिस कुरेशी, यांच्यासह आशा स्वयंसेविकांनी सहकार्य केले. सद्य:स्थितीत गावात सर्दी, ताप, खोकलासारख्या आजाराने पीडित लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे, त्यामुळे आरोग्य विभागाच्या चमूने घरोघरी भेटी देऊन आजाराबाबतचे सर्वेक्षण करून रुग्णावर उपचार करणे, नागरिकांनी कोरोना चाचणी करून घेण्यासह कोरोना लस घेण्यासाठी प्रेरित करण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याची गरज आहे.