कोरोनाला वाकुल्या दाखवित उडाला एक हजारावर लग्नांचा बार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:42 AM2021-04-20T04:42:06+5:302021-04-20T04:42:06+5:30

वाशिम : गतवर्षभरापासून कोरोनाचे संकट असून, यामुळे लग्नसराईवर मर्यादा आल्या आहेत. असे असतानाही गत वर्षभरात जिल्ह्यात एक हजार १०२ ...

Corona flew over a thousand weddings showing her curves! | कोरोनाला वाकुल्या दाखवित उडाला एक हजारावर लग्नांचा बार !

कोरोनाला वाकुल्या दाखवित उडाला एक हजारावर लग्नांचा बार !

googlenewsNext

वाशिम : गतवर्षभरापासून कोरोनाचे संकट असून, यामुळे लग्नसराईवर मर्यादा आल्या आहेत. असे असतानाही गत वर्षभरात जिल्ह्यात एक हजार १०२ लग्न सोहळे पार पडले. ग्रामीण भागात मात्र लग्न सोहळ्यासाठी परवानगी घेणे शक्यतो टाळले जात असल्याने याची कुठेही नोंद नाही.

कोरोनाचा सर्वच क्षेत्राला जबर फटका बसला तसेच लग्न समारंभावरही मर्यादा आल्या. लग्न सोहळ्यासाठी पोलीस, तहसील प्रशासनाची परवानगी, याशिवाय उपस्थिती मर्यादाही आहे. त्यामुळे २०१९च्या तुलनेत २०२० - २१ या वर्षात लग्न सोहळ्यांचे प्रमाण कमी झाले तसेच ग्रामीण भागात होणाऱ्या लग्न सोहळ्यांसाठी शक्यतो परवानगी घेतली जात नाही. त्यामुळे याची नोंद नसल्याने लग्न सोहळ्याचा आकडा कमी असू शकतो. वाशिम जिल्ह्यात दरवर्षी किमान अडीच ते तीन हजारांपेक्षा अधिक लग्न सोहळे पार पडत असतात, असा अंदाज या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केला. मागील वर्षी ऐन लग्न हंगामात कोरोनाच्या संसर्गाला सुरुवात झाली. यामुळे देशात लॉकडाऊन लावण्यात आले. त्यावेळी मार्च ते ऑक्टोबरपर्यंत मंगल कार्यालये बंदच होती. नोव्हेंबरपासून ५० वऱ्हाडींच्या साक्षीनेच लग्न सोहळा पार पाडण्याचा नियम लागू करण्यात आला. पहिले नगर पालिका, पोलीस स्थानक, तहसीलदार आदींची परवानगी घेऊनच मंगल कार्यालयात लग्न सोहळे पार पडले जाऊ लागले. मात्र, काही लग्न सोहळ्यांत नियम पायदळी तुडवत शेकडो वऱ्हाडी सहभागी झाल्याने त्या वधू- वराच्या वडिलांवर व मंगल कार्यालयांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली. ५० जणांची मर्यादा पाळून जिल्ह्यात लग्न सोहळे पार पडले. आता तर लग्न सोहळ्यातील उपस्थितीवर आणखी मर्यादा आली. २५ जणांच्या उपस्थितीत लग्नसोहळा पार पाडावा लागतो. विवाह प्रसंगी कार्यालयाचे भाडे, जेवण, बस्ता व सोने यावरच जास्त खर्च केला जातो. वऱ्हाडींच्या संख्येवर मर्यादा आल्याने जेवणावळीवरील खर्च थोडा कमी झाला.

००

चौकट

एप्रिल कठीणच

जिल्ह्यात लहान, मोठी १००च्या जवळपास मंगल कार्यालये, लॉन आहेत. ‘ब्रेक द चेन’ सुरू झाल्याने नियम आणखी कडक करत लग्नात २५ जणांनाच परवानगी दिली आहे. प्रत्येक मंगल कार्यालयात मार्च महिन्याच्या ५ ते ६ तारखा बुक झाल्या होत्या. या महिन्यात होणारे काही लग्न सोहळे रद्द करण्यात आले व तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

००००००

मंगल कार्यालय चालकांच्या प्रतिक्रिया

गेल्यावर्षी जवळपास पाच ते सहा महिने मंगल कार्यालये बंदच होती. गत तीन, चार महिन्यांपासून मंगल कार्यालये सुरू झाली होती. मात्र, आता पुन्हा कोरोनाचा कहर सुरू झाल्याने परिस्थिती बिकट आहे. लग्नाच्या तारखा बुक झाल्या होत्या. काहींनी लग्न तारखा पुढे ढकलल्या.

- शिवाजी वाटाणे

संचालक, मंगल कार्यालय, वाशिम

०००

कोरोनामुळे लग्न समारंभावर मर्यादा आल्या. गेल्या वर्षीदेखील कमी प्रमाणात लग्न झाले. आता पुन्हा कोरोनाचे संकट असल्याने म्हणावे तेवढे लग्न समारंभ नाहीत. फारशी बुकींगही नाही. लग्न समारंभ उपस्थितीवरही मर्यादा आहेत.

- लोथ

संचालक, मंगल कार्यालय, वाशिम

०००००

चौकट

वर्षभरात ६१ लग्नतिथी

पंचांगानुसार वर्षभरात ६१ लग्नतिथी दिल्या आहेत. एप्रिल ते जुलै यादरम्यान ३२, तर नोहेंबर २०२१ ते मार्च २०२२ यादरम्यान २९ लग्नतिथी आहेत. मात्र, कोरोनाचा कहर सुरूच असल्याने आणि परवानगीची किचकट प्रक्रिया असल्याने अनेकजण लग्न सोहळे पुढे ढकलत असल्याचे दिसून येत आहे.

०००००००

२०० जणांचे रजिस्टर्ड शुभमंगल

कोरोनाचा संसर्ग वाढत असताना वऱ्हाडी बोलावण्यापेक्षा सहदुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी विवाह करण्याचा निर्णय काही वधू - वरांनी घेतला. मागील वर्षभरात २०० जणांनी विवाह नोंदणी केल्याची माहिती आहे.

Web Title: Corona flew over a thousand weddings showing her curves!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.