कोरोनामुक्त रुग्णास टाळ्याच्या गजरात रुग्णालयातून सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 02:14 PM2020-04-25T14:14:10+5:302020-04-25T14:14:24+5:30

रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यास २५ एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालयातर्फे टाळयांच्या गडगडाटात डिस्चार्ज देण्यात आला.

Corona-free patient discharged from the hospital with a round of applause | कोरोनामुक्त रुग्णास टाळ्याच्या गजरात रुग्णालयातून सुटी

कोरोनामुक्त रुग्णास टाळ्याच्या गजरात रुग्णालयातून सुटी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हयात पहिला कोरोनाचा पॉझिटीव्ह  रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली होती. सदर रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यास २५ एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालयातर्फे टाळयांच्या गडगडाटात डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी आयसोलेशन वार्डातील डॉक्टर, परिचारिका  व कर्मचाºयांनी भावूक होऊन कोरोनामुक्त रुग्णास निरोप दिला. रुग्णानेही अतिशय कठोर अंतकरणाने आरोग्य विभागाचे आभार मानलेत.
जिल्ह्याबाहेर प्रवास करून आलेल्या या व्यक्तीला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची बाब ३ एप्रिल रोजी आलेल्या त्याच्या घशातील स्त्रावाच्या अहवालावरून समोर आली. त्यानंतर कोरोना बाधित व्यक्तींवर उपचार करण्यासाठी नेमलेल्या आरोग्य पथकाने त्याच्यावर शासनाच्या नियमावलीनुसार उपचार सुरु केले. सातत्याने उपचार करून १४ व १५ व्या दिवशी त्याच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. मात्र, यामधील एक अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आला. त्यामुळे या व्यक्तीचा रुग्णालयातील मुक्काम पाच दिवसांनी वाढला. पुढील पाच दिवस उपचार केल्यानंतर २० व २१ व्या दिवशी पुन्हा घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले. यावेळी मात्र, त्याच्यावर उपचार करणाº्या आरोग्य पथकाच्या प्रयत्नांना यश आले. या व्यक्तीचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याचे २४ एप्रिल रोजी स्पष्ट झाले. त्यामुळे त्याला रुग्णालयातून सोडण्याचा मार्ग मोकळा झाला.  २५ एप्रिल रोजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आहेर यांच्या उपस्थित या व्यक्तीला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यावेळी उपस्थित वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांनी या व्यक्तीला टाळ्या वाजवून निरोप दिला. यावेळी भावूक होत सदर व्यक्तीने त्याच्यावर उपचार करणाº्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचाº्यांचे आभार मानले. तसेच जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेला सुद्धा धन्यवाद दिले.
 
‘साहब आपने बहोत मेहनत किया - रुग्ण
‘साहब, आपने बहोत मेहनत किया...’ असे म्हणत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाने जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेचे आभार मानेल. यावेळी कोरोनामुक्त रुग्णांमध्ये एक वेगळा उत्साह दिसून आला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांच्या उपस्थितीत वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांनी त्या व्यक्तीला टाळ्या वाजवून निरोप दिला.

Web Title: Corona-free patient discharged from the hospital with a round of applause

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.