मार्च महिन्यात शहरात ५८५ लोकांना कोरोना संसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:40 AM2021-04-06T04:40:26+5:302021-04-06T04:40:26+5:30

शहरात दर दिवशी अनेक व्यक्तींना कोरोना संसर्ग असल्याचे निदान होत आहे. त्यात रिसोडच्या कोविड सेंटरमध्ये कुठल्याही सुविधा नसल्यामुळे तिथे ...

Corona infection in 585 people in the city in March | मार्च महिन्यात शहरात ५८५ लोकांना कोरोना संसर्ग

मार्च महिन्यात शहरात ५८५ लोकांना कोरोना संसर्ग

Next

शहरात दर दिवशी अनेक व्यक्तींना कोरोना संसर्ग असल्याचे निदान होत आहे. त्यात रिसोडच्या कोविड सेंटरमध्ये कुठल्याही सुविधा नसल्यामुळे तिथे जाण्यास कोरोनाबाधित नकार देत आहेत. परिणामी अनेक रुग्णांच्या संपर्कात पॉझिटिव्ह रुग्ण येत असल्यामुळे शहरात दिवसेंदिवस पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. शिवाय महसूल प्रशासनाने कडक निर्बंध लावल्यामुळे अनेक रुग्णांना घरीसुद्धा क्वाॅरंटाइन होता येत नाही. त्यामुळे कोरोनाबाधित प्रशासनास खोटी माहिती देऊन घरीच उपचार करताना आढळून येत आहेत; परंतु या सर्व कारणांमुळे रिसोड शहरात संसर्ग साथीचा मोठा प्रसार वाढत असून, पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, नगरपालिका प्रशासन, आरोग्य विभाग यांनी कडक सूचना देऊन यावर नियंत्रण मिळविणे गरजेचे झाले आहे, याशिवाय तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक रुग्ण वाढत असून, तालुक्यातील गोवर्धन येथे एका शिक्षकाचा मेहकर येथे कोरोनाने मृत्यू झाल्यामुळे शिक्षकवर्गातही घबराटीचे वातावरण पसरले आहे.

Web Title: Corona infection in 585 people in the city in March

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.