कामरगावात कोरोना तपासणी शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:44 AM2021-04-23T04:44:07+5:302021-04-23T04:44:07+5:30
दिवसेंदिवस वाढत असलेला कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी बाधित रूग्ण ओळखून त्यांच्यावर उपचार करणे गरजेचे असल्याने प्रशासनाकडून ठिकठिकाणी कोरोना तपासणी ...
दिवसेंदिवस वाढत असलेला कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी बाधित रूग्ण ओळखून त्यांच्यावर उपचार करणे गरजेचे असल्याने प्रशासनाकडून ठिकठिकाणी कोरोना तपासणी शिबिर आयोजित केली जात आहेत. त्यानुसार कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील भारतीय स्टेट बँक व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत १९ एप्रिलपासून कोरोना तपासणी शिबिर आयोजित केले आहे. १९ व २० एप्रिल या दोन दिवसांत कामरगाव येथील भारतीय स्टेट बँकेतील शिबिरात १०२ तर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील शिबिरात १०७ जणांची कोरोना तपासणी करण्यात आल्याची माहिती बँक प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. सद्य:परिस्थितीत पीककर्जाचा हंगाम सुरू असल्याने दोन्ही बँक शाखांत शेतकऱ्यांसह सर्वसामान्य ग्राहकांची गर्दी होत होती; परंतु १९ एप्रिलपासून बँक परिसरात कोरोना तपासणी शिबिर आयोजित केल्याने बँकेतील गर्दी ओसरल्याचे यावेळी दिसून आले.