कोरोनामुळे लहान मुले झाली ‘मोटू’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:27 AM2021-07-04T04:27:49+5:302021-07-04T04:27:49+5:30

गतवर्षीपासून कोरोना संसर्गामुळे मुलांच्या शाळा ऑनलाइनच आहेत. सद्य:स्थितीतही डेल्टा प्लसच्या संभाव्य धोक्यामुळे कठोर निर्बंध लावण्यात आले असून, मुलांना घराबाहेर ...

Corona makes kids 'fat'! | कोरोनामुळे लहान मुले झाली ‘मोटू’ !

कोरोनामुळे लहान मुले झाली ‘मोटू’ !

Next

गतवर्षीपासून कोरोना संसर्गामुळे मुलांच्या शाळा ऑनलाइनच आहेत. सद्य:स्थितीतही डेल्टा प्लसच्या संभाव्य धोक्यामुळे कठोर निर्बंध लावण्यात आले असून, मुलांना घराबाहेर पडण्याचा मार्ग अद्यापही बऱ्याचअंशी बंद आहे. गेल्या दीड वर्षापासून शहरी भागातील मुले घरातच राहत आहेत. लहान मुलांना नवनव्या गोष्टींचे आकर्षण असते. शिवाय, खेळात ते भरपूर रमतात; परंतु आता कोरोनामुळे घराबाहेर पडणे बंद झाले असून, त्यांच्या शारीरिक हालचाली कमालीच्या कमी झाल्या आहेत. त्यात ऑनलाइन शिक्षण आणि मनोरंजनाचे साधन म्हणून मुलांचा सोशल मीडियावर वावर वाढला. मोबाइल गेमचे वेड त्यांना लागले. ते घरात सतत टीव्ही आणि मोबाइलसमोरच राहत आहेत. शिवाय जंकफूड, तेलकट, गोड पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढले. याच कारणांमुळे मुलांचे वजन वाढून ते ‘मोटू’ झाल्याचे दिसत आहे.

----------------

बॉक्स : वजन वाढले कारण...

१) गेल्या दीड वर्षापासून मुले घरातच राहत आहेत. त्यामुळे खेळणे बंद असून, त्यांच्या शारीरिक हालचाली कमालीच्या कमी झाल्या आहेत.

२) त्यात ऑनलाइन शिक्षण आणि मनोरंजनाचे साधन म्हणून मुलांचा मोबाइलवर आणि सोशल मीडियावर वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

३) सतत घरात राहत असल्याने मुलांना मोबाइल गेमचे वेड त्यांना लागले. ते घरात सतत टीव्ही आणि मोबाइलसमोरच राहत आहेत.

४) जंकफूड, तेलकट, गोड पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढले. याच कारणांमुळे मुलांचे वजन वाढून ते लठ्ठ झाल्याचे दिसत आहे.

------------------------

बॉक्स: वजन कमी करण्यासाठी ही घ्या काळजी

१) वाढलेले वजन कमी करण्यासाठी संतुलित आहार (प्रथिनेयुक्त आहार) अत्यावश्यक आहे. शरीराच्या हालचाली वाढविण्यासाठी खेळ, व्यायाम करावा.

२) वजन नियंत्रित करायचे असेल, तर ८० टक्के डायट आवश्यकच आहे. शिवाय प्राणायाम, सूर्यनमस्कार, दररोज पाच ते दहा हजार पावले चालण्याची गरज आहे.

३) मुलांच्या स्क्रीन टाईमवर लक्ष ठेवणे अर्थात त्याला फार काळ मोबाइल, टीव्ही न पाहू देणे, जंकफूड, अतिगोड पदार्थ न देणे, एकाच ठिकाणी न बसता शारीरिक हालचाली वाढविणे आवश्यक आहे.

-------------------

बॉक्स : मुले टीव्ही, मोबाइल सोडतच नाहीत

१) कोट : गेल्या दीड वर्षांपासून शिक्षण ऑनलाइन झाले आहे. त्यात कोरोनामुळे निर्बंध लावण्यात आल्याने मुले घरात सतत टीव्ही समोर बसतात किंवा मोबाइल गेम खेळत राहतात. त्यांना आवर घालण्याचा प्रयत्न केला तरी ते काही काळानंतर टीव्ही, मोबाईल समोरच बसतात.

- फिरोज परसूवाले,

पालक

-----------------

२) ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांना मोबाइलचे वेड लागले आहे. ऑनलाइन क्लासपेक्षा मोबाइल गेम खेळण्यातच त्यांचा वेळ अधिक जात असून, ते एकाच ठिकाणी तासन्‌तास बसून राहतात. चालणे, फिरणे बंद आहे. सांगूनही ते मोबाईल सोडत नाहीत.

- सारिका पवार,

महिला पालक

--------------

लहान मुलांचे डॉक्टर म्हणतात

१) कोट : कोरोना संसर्गामुळे लहान मुलांचे घराबाहेर पडणे बंद झाले. त्यामुळे शारीरिक हालचाली कमी झाल्याने मुलांचे वजन वाढले आहेत. विशेष करून मुलांच्या पोटावरील चरबी अधिक प्रमाणात वाढल्याचे आढळून येत आहे. संतुलित आहार आणि नियमित व्यायाम केल्यास हे वजन नियंत्रणात आणणे शक्य आहे. व्यायामामध्ये अगदी चालण्याचा व्यायामही करता येतो.

- डॉ. विजय कानडे

----------------

२) कोट : कोरोना काळात कठोर निर्बंध आणि ऑनलाइन शिक्षणासह संसर्गाच्या भीतीमुळे मुलांना सहसा बाहेर पडू दिले जात नाही. त्यामुळे त्यांच्या शारीरिक हालचाली कमी झाल्या असून, फास्ट फूड, जंक फूड, तेलकट पदार्थांचे सेवन वाढल्याने मुलांचे वजन वाढत आहे. साधारणत: २० ते २५ टक्क्यांनी मुलांचे वजन वाढल्याचे आढळून येत आहे.

-डॉ. प्रवीण वानखडे

Web Title: Corona makes kids 'fat'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.