’कोरोना’ राजकारण करण्याचा विषय नव्हे - गृहमंत्री अनिल देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 01:38 PM2020-05-28T13:38:26+5:302020-05-28T13:38:48+5:30
व्हीडीओ व्हायरल करुन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे योग्य नसल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.
- नंदकिशोर नारे
वाशिम : संपूर्ण राज्यात कोरोना विषाणुचा फैलाव रोखण्यासाठी सर्व यंत्रणा जिवापाड मेहनत घेवून काम करीत आहे. काही राजकारणी मात्र राजकारण करीत आहेत, कोरोनाबाबत राजकारण करणाºया राजकारणाºयांना सांगू इच्छितो की, हा राजकारण करण्याचा विषय नव्हे. याबाबत राजकारण न करण्याचे आवाहन मी करतोय. कोणी काय काय व्हीडीओ व्हायरल करुन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे योग्य नसल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले. ते जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत २७ मे रोजी बोलत होते.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना राज्यात कोरोनाच्या पृष्ठभूमिवर करण्यात आलेल्या उपाय योजनांसह कोरोनाशी निगडीत विषयासंबधित सविस्तर माहिती दिली. राज्यातील पोलिसांना विविध कोविड रुग्णालयामध्ये उपचाराकरिता सहाय्य मिळण्यासाठी कोविड हेल्पलाईन सुरु करण्यात आली. तसेच पोलीस महासंचालक कार्यालयाकडून साडेसात लाख मास्क ज्यामध्ये दीड लाख एन- ९५, सहा लाख ३ प्ले, १५ हजार लिटर सॅनिटायझर, २२ हजार फेस शिल्ड, ४४ हजार हॅन्डग्लोजव ड्रोनचा समावेश आहे ज्याची किंमत जवळपास ४ कोटी रुपये इतकी आहे. याउपरही आवश्यकता भासल्यास पोलीस कल्याण निधीतून खरेदीचे अधिकार सर्व घटक प्रमुखांना देण्यात आले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हाधिकारी रुषिकेष मोडक, पोलीस अधीक्षक वसंत परदेसी, खा. भावना गवळी, जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार अमित झनक, शुभदा नायक आदिंची उपस्थिती होती.
पोलीस कर्मचाºयांना कर्तव्यात सूट
कोरोनाच्या पृष्ठभूमिवर ५० वर्षावरील पोलीस कर्मचारी यांना जनतेच्या संपर्कातील कुठलेही कर्तव्य न देण्याचे व ५५ वर्षवरील पोलीस कर्मचारी यांना पगारी रजा देण्याची सूट देण्यात आली आहे. तसेच हुतात्मा निधीतून मरण पावलेल्या कर्मचाºयांच्या वारसांना १० लाख रुपये देण्यात येत आहेत. पोलीसांची काळजी घेण्यासाठी कोविड कक्ष स्थापन करुन नोडल अधिकाºयांची नेमणूक करण्यात आली आहे.
कोरोना विषाणुचा राज्यात संसर्ग होत असतांना वाशिम जिल्हयातील बोरकर नामक पोलीस कर्मचाºयाचा मृत्यू झाला होता याबाबत पत्रकार परिषदेत श्रध्दांजली अर्पित करण्यात आली. तसेच त्या कर्मचाºयाच्या कुटुंबियाला शासकीय मदत दिल्या जाणार असल्याचे सांगितले.