रिसोड तालुक्यात कोरोनाचा उद्रेक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:39 AM2021-04-17T04:39:42+5:302021-04-17T04:39:42+5:30
रिसोड शहरात गतवर्षी जून महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला. गतवर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत शहरासह तालुक्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव होता. त्यानंतर ...
रिसोड शहरात गतवर्षी जून महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला. गतवर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत शहरासह तालुक्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव होता. त्यानंतर कोरोनाचा आलेख खाली येत होता. मागील दोन महिन्यांपासून कोरोनाचा आलेख उंचावला असून, रिसोड शहरासह तालुक्यातही कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. अलिकडेच्या काळात रिसोड शहरापेक्षा ग्रामीण भागात अधिक संख्येने रुग्ण आढळून येत आहेत. बुधवार, १४ एप्रिल रोजी एकाच दिवसात तालुक्यात ३०० रुग्ण आढळले. गुरूवारी ४३ रुग्ण आढळले. यामुळे तालुका प्रशासन प्रशासन अलर्ट झाले आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहून कोरोना नियमाचे पालन करावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, मास्कचा वापर करावा तसेच फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे तसेच पंचेचाळीस वर्षांवरील व्यक्तीने तत्काळ लस घेण्यात यावी असे आवाहन करण्यात आले.