पाेहरादेवीत कोरोना आणि संचारबंदीच्या नियमांना फाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:42 AM2021-02-24T04:42:17+5:302021-02-24T04:42:17+5:30
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर गत अनेक दिवसांपासून माध्यमांपासून दूर राहिलेले वनमंत्री संजय राठोड हे मंगळवारी बंजारा समाजाची काशी समजल्या ...
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर गत अनेक दिवसांपासून माध्यमांपासून दूर राहिलेले वनमंत्री संजय राठोड हे मंगळवारी बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे दर्शनासाठी दाखल झाले. या वेळी कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. या वेळी धक्काबुक्की झाल्याने समर्थकांनी पोलिसांवर दगड भिरकावल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.
संजय राठाेड पाेहरादेवीत येणार असल्याने त्यांच्या समर्थकांनी सकाळपासूनच पाेहरादेवीकडे निघण्यासाठी गर्दी केली, परंतु पाेलिसांनी त्यांना रस्त्यातच राेखण्याचा प्रयत्न केला गेला. मंदिर परिसरात तरीसुद्धा हजाराे समर्थक पाेहोचले व घाेषणाबाजी सुरू केली. संजय राठाेड मंदिर परिसरात आल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी आलेले समर्थक गर्दी करीत असल्याने पाेलिसांनी त्यांना राेखण्याचा प्रयत्न केला असता काेणीतरी दगड मारण्याचा प्रयत्न केल्याने पाेलिसांनी समर्थकांवर साैम्य लाठीचार्ज केला.
...............
समर्थकांचा पोलिसांवर रोष आणि दगडफेक
वनमंत्री पोहरादेवी संस्थानच्या प्रवेशद्वारावर वाहनातून उतरताना समर्थकांनी मंत्र्यांच्या दिशेने धाव घेतली. या गर्दीला अडविण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला असता, त्याचा प्रतिकार म्हणून समर्थकांकडून पोलिसांच्या दिशेने दगडफेक करण्यात आली. सुदैवाने यामध्ये कुठलीही दुर्घटना घडली नाही. दरम्यान, समर्थकांनी प्रसारमाध्यमावरही हल्ल्याचा प्रयत्न केला.
.............
वनमंत्र्यांचे पोहरादेवीला सपत्नीक दर्शन
संजय राठोड पोहरादेवी येथे त्यांच्या पत्नी शीतल राठोड यांच्यासह १५ दिवसांनी उपस्थित झाले. याप्रसंगी वनमंत्र्यांनी सपत्नीक जगदंबादेवी, बाबनालाल महाराज तद्नंतर संत डॉ. रामराव महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, उपविभागीय अधिकारी डॉ. राहुल जाधव तसेच प्रभारी तहसीलदार संदेश किर्दक उपस्थित होते.