इंझोरीत दीड महिन्यानंतर कोरोना रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:20 AM2021-01-24T04:20:37+5:302021-01-24T04:20:37+5:30
------------ जि.प.शाळांची पाहणी पोहरादेवी: येत्या २७ जानेवारीपासून माध्यमिक शाळा सुरू होत आहेत. यासाठी शिक्षण विभागाची तयारी सुरू असून, शाळांच्या ...
------------
जि.प.शाळांची पाहणी
पोहरादेवी: येत्या २७ जानेवारीपासून माध्यमिक शाळा सुरू होत आहेत. यासाठी शिक्षण विभागाची तयारी सुरू असून, शाळांच्या स्थितीची पाहणी शिक्षण विभागाकडून केली जात आहे. या अंतर्गत शुक्रवारी गट शिक्षणाधिकाऱ्यांनी पोहरादेवी परिसरातील जि.प. शाळांना भेटी देऊन व्यवस्थेची पाहणी केली.
------------
अवैध दारूभट्ट्यांवर कारवाई
कामरगाव: गेल्या काही दिवसांपासून परिसरात गावठी दारूचे गाळप करून अवैध विक्रीचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण होत असल्याने धनज बु. पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल ठाकरे यांच्या मार्गदर्शनात कामरगाव चौकीतील पोलिसांनी गावठी दारूभट्ट्यांवर धाडसत्र सुरू केले. यात शनिवारी तीन ठिकाणी छापे टाकून अवैध दारू नष्ट करण्यात आली.
----------------
कृषी विभागाकडून पीक पाहणी
धनज बु.: गेल्या काही दिवसांपासून रबी पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव होत आहे. या पार्श्वभूमीवर तालुका कृषी अधिकारी संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनात कृषी सहायक, मंडळ अधिकाऱ्यांनी पीक पाहणी कार्यक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत शनिवारी कृषी विभागाच्या पथकाने धनज बु. परिसरातील शेतांना भेटी देऊन कीड नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
--------------
लोणी येथे मोबाइलचा स्फोट
लोणी बु.: नामांकित कंपनीच्या मोबाइलचा स्फोट झाल्याची घटना शनिवार, २३ जानेवारीला लोणी बु. येथे घडली. मोबाइलवर संवाद सुरू असताना तो गरम होत असल्याचे आढळल्यानंतर बाजूला ठेवल्यामुळे यात कोणालाही इजा झाली नाही. प्रदीप श्रीराम बोडखे यांच्या मालकीचा हा फोन होता.
------------