गोभणी येथे एक कोरोना रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:44 AM2021-01-13T05:44:07+5:302021-01-13T05:44:07+5:30
००००० निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात जऊळका रेल्वे : जऊळका रेल्वे ग्रामपंचायतची निवडणूक चुरशीची होत असून प्रचार अंतिम टप्प्यात पोहचला ...
०००००
निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात
जऊळका रेल्वे : जऊळका रेल्वे ग्रामपंचायतची निवडणूक चुरशीची होत असून प्रचार अंतिम टप्प्यात पोहचला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून आहे. यामध्ये कोण बाजी मारणार हे मतमोजणीनंतर स्पष्ट होईल.
००००
आचारसंहितेचे पालन करण्याच्या सूचना
शिरपूर : शिरपूरसह परिसरातील ग्रामपंचायतींची निवडणूक होत असून, कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून आचारसंहिता, प्रतिबंधात्मक आदेशांचे पालन करावे, असे आवाहन शिरपूर पोलीस स्टेशन प्रशासनाने मंगळवारी केले. या आदेशाचे कुणी उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला.
०००००
अर्ज करण्यास मुदतवाढ द्या !
किन्हीराजा : कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ११ जानेवारीपर्यंत महा-डीबीटी संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. तांत्रिक कारणामुळे अनेक शेतकऱ्यांना अर्ज सादर करता आले नाहीत. अर्ज करण्यास मुदतवाढ देण्याची मागणी शेतकºयांनी मंगळवारी कृषी विभागाकडे केली.
०००००
बंधाºयाचे गेट नादुरुस्त; शेतकरी त्रस्त
रिठद : रिठद परिसरातील पैनगंगा नदीवर असलेल्या बंधाऱ्याचे काही गेट नादुरुस्त असल्याने पाणी वाहून जात आहे. त्यामुळे सिंचन करण्याकरिता बंधाऱ्यात पाणी राहण्याची शक्यता कमी आहे. नादुरुस्त गेट बदलून देण्याची मागणी नारायणराव आरू यांनी मंगळवारी केली.
०००००
आमखेडा येथे आरोग्य तपासणी
मालेगाव : मालेगाव तालुक्यातील आमखेडा येथे एका जणाचा कोरोना चाचणी अहवाल १० जानेवारी रोजी पॉझिटिव्ह आला. खबरदारीचा उपाय म्हणून संदिग्ध रुग्णांची तपासणी करण्यात आली. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.