कोरोना रुग्ण घेताहेत खाजगी दवाखान्यात उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:42 AM2021-05-19T04:42:36+5:302021-05-19T04:42:36+5:30
संपूर्ण मालेगाव तालुक्यात व शहरात खाजगी रुग्णालयात कोरोना संशयित रुग्णावर काही बीएएमएस डॉक्टर सुद्धा रुग्णालयास परवानगी नसतानाही भरती करून ...
संपूर्ण मालेगाव तालुक्यात व शहरात खाजगी रुग्णालयात कोरोना संशयित रुग्णावर काही बीएएमएस डॉक्टर सुद्धा रुग्णालयास परवानगी नसतानाही भरती करून उपचार करीत असल्याचे दिसून येते. त्यामुळे या दवाखान्यात येणाऱ्या इतर रुग्णांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दवाखान्यातून घरी परतताना काही रुग्ण तर सार्वजनिक ठिकाणी फिरताना दिसत आहेत. त्यामुळे हा प्रकार कोरोना संक्रमण फैलावण्यासाठी कारणीभूत ठरत असल्याचे बोलले जात आहे. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देणे अपेक्षित आहे.
कोट
खाजगी रूग्णालयातील डॉक्टरांनी रुग्णाला कोरोना चाचणी करायला सांगावे आणि कोरोनाच्या अधिकृत दवाखान्यात उपचार घेण्यास सांगावे. जर असे रुग्ण तपासले तर डॉक्टर स्वतः आणि इतर रुग्णांदेखील संसर्ग होऊ शकतो. म्हणून काळजी घावी.
डॉ संतोष बोरसे
तालुका आरोग्य अधिकारी मालेगाव