कोरोना रुग्णांनी व्यायाम, आहारावर लक्ष द्यावे - डॉ.संतोष बोरसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 07:59 PM2020-10-03T19:59:40+5:302020-10-03T20:00:21+5:30

Coronavirus in Washim तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष बोरसे यांच्याशी शनिवारी साधलेला हा संवाद.

Corona patients should pay attention to exercise, diet - Dr. Santosh Borse | कोरोना रुग्णांनी व्यायाम, आहारावर लक्ष द्यावे - डॉ.संतोष बोरसे

कोरोना रुग्णांनी व्यायाम, आहारावर लक्ष द्यावे - डॉ.संतोष बोरसे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असून, कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून नागरिकांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. कोरोना संसर्ग झाल्यानंतर रुग्णांनी कोणती पथ्ये पाळावी, कोरोनावर मात केल्यानंतर कोणता आहार घ्यावा, व्यायामावर भर कसा द्यावा, यासंदर्भात वैद्यकीय अधिकारी तथा मालेगावचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष बोरसे यांच्याशी शनिवारी साधलेला हा संवाद. कोरोनातून बरे झाल्यानंतर आहार व व्यायामावर विशेष भर द्यावा, असा सल्ला डॉ. बोरसे यांनी दिला.


कोरोना विषाणू संसर्गापासून नागरिकांनी सतर्क कसे राहावे?
कोरोनापासून बचाव म्हणून नागरिकांनी फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क किंवा रुमालचा वापर आणि हात वारंवार स्वच्छ धुणे या त्रिसूत्रीचे पालन करणे अत्यावश्यक आहे. सध्या कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रत्येकाने अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे.


कोरोना संसर्गादरम्यान कोणती पथ्थे पाळावीत?
कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर संबंधित रुग्णाने सर्वप्रथम न घाबरता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावे. वेळीच निदान व उपचार मिळाल्याने कोरोनातून बरे होणाºयाचे प्रमाण जास्त आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढविणाºया अन्नपदार्थ्यांचा आहारात सर्वाधिक वापर करावा.


कोरोनातून बरे झाल्यावर पुढे कोणती दक्षता घ्यावी?
 कोरोनावर मात केल्यानंतर संबंधित रुग्णाने व्यायाम व सकस आहारावर भर द्यावा. हळदयुक्त दूध घ्यावे, भाजीपाला, फळांचा वापर आहारात करावा. नियमित व वेळेवर भोजन घ्यावे, एकाकीपण जाणवणार नाही तसेच मानसिक तणाव येणार नाही याची दक्षता घ्यावी. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी भोजनात सलादचा वापर करावा. सलादमध्ये टमाटर, बीट, मेथीचा वापर असावा. तत्पूर्वी ते कोमट पाण्यात लिंबू पिळून स्वच्छ करून घ्यावे. ग्रीन टिचे प्राशन करावे. त्यामध्ये अद्रक, दालचिनी, तुळशीची पाने, गवती चहा व गूळाचा समावेश करता येईल.


कोणती फळे सेवन करावी?
क जीवनसत्व असणाºया फळांचे सेवन करणे अधिक उत्तम. संत्रा, मोसंबी आदी फळांचे सेवन आरोग्यदायी मानले जाते. तसेच बाहेरचे खाद्यपदार्थ टाळावे, उघड्यावर शिजविलेले खाद्यपदार्थ खाऊ नयेत. निरोगी शरीरासाठी आवश्यक असलेला हलका व्यायाम नियमित करावा. रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी नागरिकांनी सकस आहारावर सर्वाधिक भर दिला तर कोरोनापासून पुढील काळातही बचाव होऊ शकतो.
 
कोरोनावर मात करून घरी परतल्यावर त्या रुग्णाकडे पाहण्याचा काहींचा दृष्टिकोन बदलतो. समाजाने कोरोना रुग्णांप्रती असलेला दृष्टिकोन बदलला पाहिजे. मनोधैर्य वाढेल, अशी वर्तणूक ठेवावी. कोरोनाच्या दुसºया लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे यापुढे अधिक सतर्क राहून प्रत्येकानेच स्वत:बरोबरच इतरांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, गर्दीत जाणे टाळावे, मास्क किंवा रूमालचा नेहमी वापर करावा..

Web Title: Corona patients should pay attention to exercise, diet - Dr. Santosh Borse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.